शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

लोकसभेचे पडघम : गडकरींविरोधात यावेळी नाना नसतील तर मग कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2023 10:22 IST

भाजपकडे चार आमदारांची शिबंदी, उपमुख्यमंत्री फडणवीस यांची ताकद, विधान परिषदेच्या विजयांमुळे महाविकास आघाडीत उत्साह

श्रीमंत माने/कमलेश वानखेडे

नागपूर : गेल्या वेळी उमेदवारी व लढतीची हवा करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले येत्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात लढणार नाहीत, असे स्वत: त्यांनीच देवडिया काँग्रेस भवनात स्पष्ट केले असल्याने नव्या दमाच्या उमेदवाराचा शोध सुरू आहे. विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील विजयांमुळे उत्साह व उमेद वाढलेल्या आघाडीकडून गडकरींची हॅट् ट्रिक रोखण्यासाठी जोरदार तयारी सुरू असली तरी सारे काही उमेदवारीवर अवलंबून असेल.

लोकसभेच्या दोन निवडणुकींदरम्यान अभिजित वंजारी यांनी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ तब्बल पाच दशकांनंतर भाजपकडून हिसकावून घेतला, तर अत्यंत प्रतिष्ठेच्या शिक्षक मतदारसंघात अलीकडेच ना. गो. गाणार यांचा महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले यांनी पराभव केला. हे दोन विजय म्हणजे जिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय त्या नागपूरमधील भाजपची संधी संपवली, असा प्रचार काँग्रेस नेते करू लागले. दलित, मुस्लीम, कुणबी अर्थात डीएमके फॉर्म्युला अंमलात आणण्याची तयारी सुरू आहे; पण लोकसभेची निवडणूक विधान परिषदेइतकी सोपी नाही, हेदेखील स्पष्ट आहे.

विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत काँग्रेसने नागपूर व विदर्भात मुसंडी मारली. तरीही नागपूर लोकसभा मतदारसंघातील सहापैकी चार जागा भाजपने जिंकल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (नागपूर दक्षिण पश्चिम), मोहन मते (दक्षिण), कृष्णा खोपडे (पूर्व) व विकास कुंभारे (मध्य) अशी चार आमदारांची शिबंदी भाजपच्या दिमतीला आहे. डॉ. नितीन राऊत (उत्तर) व विकास ठाकरे (पश्चिम) हे दोनच मतदारसंघ काँग्रेसकडे आहेत. गेल्या वेळी यापैकी फक्त नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघात नाना पटोले यांना मताधिक्य होते, हे येथे उल्लेखनीय. आता नाना पटोले लढणार नसतील तर कोण, हा काँग्रेसपुढे प्रश्न आहे. विकास ठाकरे, प्रफुल्ल गुडधे, डॉ. बबनराव तायवाडे यांची नावे त्यासाठी चर्चेत आहेत.

नागपूर लोकसभा मतदारसंघ

विधानसभा मतदारसंघनिहाय मते : २०१९ :: मतदारसंघनिहाय मते : २०१४

नितीन गडकरी - नाना पटोले : नितीन गडकरी - विलास मुत्तेमवार

  • नागपूर दक्षिण-पश्चिम : १,२०,१८५ - ६५,०६९ : १,०६,७२५ - ४४,००२
  • नागपूर दक्षिण : १,१४,८४५ - ७१,४२१ : १,०५,००० - ४४,७२८
  • नागपूर पूर्व : १,३५,४५१ - ६०,०७१ : १,१२,९६८ - ४७,२२६
  • नागपूर मध्य : ९६,३४६ - ७३,८४९ : ९४,१६२ - ५४,२३५
  • नागपूर पश्चिम : १,०२,९१६ - ७५,६६४ : ९३,२५६ - ५६,२४१
  • नागपूर उत्तर : ८७,७८१ - ९६,६९१ : ७४,७४६ - ५६,२०६

टपाली मते : २५९७ - १४४७ : ९१० - ३०१

एकूण : ६,६०,२२१ - ४,४४,२१२ : ५,८७,७६७ - ३,०२,९१९

- २०१४ मध्ये बसपाचे डॉ. मोहन गायकवाड यांना ९६ हजार ४३३, तर आम आदमी पक्षाच्या अंजली दमानिया यांना ६९ हजार ८१ मते मिळाली.

- २०१९ मध्ये व बसपाचे मो. जमाल व वंचित बहुजन आघाडीचे मनोहर डबरासे यांना अनुक्रमे ३१ हजार ७२५ व २६ हजार १२८ मते मिळाली.

टॅग्स :PoliticsराजकारणNitin Gadkariनितीन गडकरीNana Patoleनाना पटोलेnagpurनागपूरlok sabhaलोकसभा