शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

नववर्षाच्या स्वागतासाठी पहाटेपर्यंत सुरू राहणार मद्यालये

By मोरेश्वर मानापुरे | Updated: December 28, 2023 19:36 IST

कायद्याचे उल्लंघन केल्यास भरावा लागेल दंड : नियमांतर्गत करावे लागणार आयोजन

नागपूर : नववर्षाच्या स्वागतासाठी मद्यालये ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीनंतरही सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य उत्पादन शुल्क विभागाने जाहीर केला आहे. त्यानुसार बिअरबार आणि क्लब पहाटे पाचपर्यंत सुरू राहणार आहेत. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी नागपूर जिल्ह्यात सर्वत्र थर्टी फस्टचे आयोजन करण्यात येते. उत्साहात साजरा होणाऱ्या आयोजनात कुठल्याही अडचणी येऊ नये म्हणून विभागाने निर्णय घेतल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

मद्य खरेदीचा परवाना असलेल्यांनाच मद्याची विक्री

मद्य खरेदीचा परवाना असलेल्यांना मद्याची विक्री करण्याची विभागाची परवानगी आहे. एका दिवसासाठी ५ रुपयांचा तात्पुरता परवाना विक्रेते देतात. असे असतानाही मद्य विक्रेते नियम डावलून मद्याची विक्री करीत असल्याचे बहुतांश दुकानांमध्ये दिसून येते. त्यावर अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याने नागपूर जिल्ह्यात हा प्रकार सर्रास सुरू असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. लहान मुलांना मद्यविक्री करू नका, अशी नागरिकांची मागणी आहे. शिवाय थर्टी फस्टची पार्टी वा जल्लोषात लहान मुलांचा समावेश करू नका, असे निर्देश विभागाने दिले आहेत.नियमाच्या उल्लंघन केल्यास होऊ शकतो दंडनववर्षाच्या स्वागतासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने नियमात शिथिलता दिली आहे. पण नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर अधिकाऱ्यांची करडी नजर राहणार आहे. प्रसंगी दंडही आकारण्यात येणार आहे. कायद्याचे उल्लंघन करून नियमांचे आयोजन करण्यात येत असेल तर आयोजकाला ३ ते ५ वर्षांपर्यंत शिक्षा आणि २५ ते ५० हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. त्यामुळे कायद्याचे पालन करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे. नियंत्रण ठेवण्यासाठी विभागाचे दोन भरारी पथके आणि सहा कार्यकारी पथके कार्यरत राहणार आहेत.मद्य परत करता येणारपार्टीत मद्य किती लागणार, याची नोंद आयोजकाला उत्पादन शुल्क विभागाकडे करावी लागणार आहे. तात्पुरता परवाना केवळ पार्टीपुरताच राहणार आहे. पार्टी संपल्यानंतर २४ तासांच्या आत उरलेले मद्य उत्पादन शुल्क विभागाकडे परत करावे लागते. उरलेल्या मद्याचा वापर अन्य ठिकाणी केल्यास परवाना घेतलेल्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमासाठी मनपाची परवानगी आवश्यक आहे. मात्र, कार्यक्रमात मद्याचा वापर होत असेल तर उत्पादन शुल्क विभागाची परवानगी बंधनकारक आहे. ग्रामीण भागात ३,३०० रुपये, शहरात ११ हजार आणि व्यावसायिक पार्ट्यांसाठी २२ हजार रुपये शुल्क विभागाकडे भरावे लागेल.

नागरिकांना करता येणार तक्रारनागरिकांना विभागाच्या मुंबई येथील आयुक्त कार्यालयाच्या सुविधा केंद्रात तक्रार करता येणार आहे. तक्रारकर्त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे. कारवाई पथकाला कुठे कारवाई करायची, याची माहिती दिली जाईल. कायद्याचे पालन करून नववर्षाचे स्वागत करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे. विभागाने टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९, व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक ८४२२००११३३ असा आहे.- अशी असेल वेळ:- वाईन शॉप (एफएल-२) : सकाळी १० ते मध्यरात्री १ पर्यंत.- बिअर शॉपी : सकाळी १० ते मध्यरात्री १ पर्यंत.- बिअरबार : सकाळी ११ ते पहाटे ५ पर्यंत.- क्लब : सकाळी ११ ते पहाट ५ पर्यंत.

 

टॅग्स :nagpurनागपूरNew Yearनववर्षliquor banदारूबंदी