इस्लाम धर्माचे प्रचारक बरकतुल्लाह सुपूर्द ए खाक

By Admin | Updated: August 28, 2014 00:50 IST2014-08-27T23:49:03+5:302014-08-28T00:50:52+5:30

इस्लाम धर्माचे प्रचारक बरकतुल्लाहखॉ रहेमातुल्लाहखॉ यांचे निधन; खामगाव येथे दफनविधी.

Barkatullah Sahoudar A Khak, a preacher of Islam religion | इस्लाम धर्माचे प्रचारक बरकतुल्लाह सुपूर्द ए खाक

इस्लाम धर्माचे प्रचारक बरकतुल्लाह सुपूर्द ए खाक

खामगाव : इस्लाम धर्माचे प्रचारक (तबलीग) बरकतुल्लाहखॉ रहेमातुल्लाहखॉ यांचे काल मंगळवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. आज बुधवारी हजारो नागरीकांच्या उपस्थितीत त्यांच्यावर खामगाव येथे बर्डे प्लॉट स्थित मुस्लिम कब्रस्थानात दफनविधी करण्यात आला.
वरकतुल्लाह यांचे वडील रहेमातुल्लाहखॉ हे विदर्भातील मुस्लिम जमीयतचे मुख्य होते. त्यांच्या निधनानंतर इस्लाम धर्माचे प्रचाराचे काम त्यांचे पुत्र बरकतुल्लाह यांनी हाती घेतले होते. आलेवाडी ता. संग्रामपूर येथे दरवर्षी होणार्‍या इज्तेमाच्या आयोजनात खान यांचे मोलाचे योगदान राहायचे.
त्यांच्या निधनाची वार्ता पसरताच महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश आधी भागातून समाज बांधवांनी खामगावकडे धाव घेतली. त्यामुळे आज त्यांच्या दफनविधीला हजारो नागरिकांची उपस्थिती होती. त्यांचे अंतिम दर्शन घेण्याकरीता सकाळपासुनच समाजबांधवांची गर्दी झाली होती.
दुपारी स्थानिक क्रीडा संकुलाच्या मैदानावर मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करून बर्डे प्लॉट स्थित मुस्लिम कब्रस्थानात त्यांचा दफनविधी पार पडला. यावेळी जनाजाला खांदा देण्यासाठी प्रत्येक जण पुढे सरसावत होता. अतिशय शिस्तबध्दरित्या शहरातील मुख्य मार्गावरून मुस्लिम कब्रस्थानवर त्यांचा जनाजा पोहचला. त्यानंतर दुपारी १२.३0 वाजता त्यांचा दफनविधी करण्यात आला.

Web Title: Barkatullah Sahoudar A Khak, a preacher of Islam religion