बार कौन्सिल निवडणूक :  नागपूरचे नऊ उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 21:50 IST2018-03-01T21:50:25+5:302018-03-01T21:50:37+5:30

बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवाच्या २५ जागांसाठी तब्बल १६४ उमेदवार रिंगणात असून त्यात नागपुरातील नऊ उमेदवारांचा समावेश आहे.

Bar Council election: Nine candidates of Nagpur in the fray | बार कौन्सिल निवडणूक :  नागपूरचे नऊ उमेदवार रिंगणात

बार कौन्सिल निवडणूक :  नागपूरचे नऊ उमेदवार रिंगणात

ठळक मुद्दे२८ मार्च रोजी मतदान

लोकमत न्यूज नेटवर्क  
नागपूर : बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवाच्या २५ जागांसाठी तब्बल १६४ उमेदवार रिंगणात असून त्यात नागपुरातील नऊ उमेदवारांचा समावेश आहे. कौन्सिलने उमेदवारांची अंतिम यादी गुरुवारी जाहीर केली.
नागपुरातील उमेदवारांमध्ये अ‍ॅड. किशोर लांबट, अ‍ॅड. अनिल गोवारदीपे, अ‍ॅड. आसिफ कुरैशी, अ‍ॅड. विकास सिरपूरकर, अ‍ॅड. ईश्वर चर्लेवार, अ‍ॅड. सुदीप जयस्वाल, अ‍ॅड. सुनील लाचरवार, अ‍ॅड. परिजात पांडे व अ‍ॅड. अनुपकुमार परिहार यांचा समावेश आहे. १ ते १५ फेब्रुवारीपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची तर, २२ फेब्रुवारी ही नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची तारीख होती. २८ मार्च रोजी मतदान ठेवण्यात आले आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र व गोव्यातील नोंदणीकृत वकिलांना मतदान करता येणार आहे. गेल्या सदस्यांचा कार्यकाळ जानेवारी-२०१५ मध्येच संपला. परंतु, विविध कारणे व राजकीय डावपेचांमुळे ही निवडणूक लांबली.

Web Title: Bar Council election: Nine candidates of Nagpur in the fray