शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

बँक घोटाळा : अशोक धवड यांचा जामीन अर्ज खारीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 6:58 PM

नवोदय अर्बन को-आॅपरेटिव्ह बँकेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप असलेले बँकेचे माजी अध्यक्ष अशोक धवड यांचा जामीन अर्ज एमपीआयडी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयाने खारीज केला. न्या. व्ही. एम. वैद्य यांनी धवड यांना हा दणका दिला.

ठळक मुद्देसत्र न्यायालयाचा निर्णय : कोरोनाच्या आधारावर दिलासा देण्यास नकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नवोदय अर्बन को-आॅपरेटिव्ह बँकेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप असलेले बँकेचे माजी अध्यक्ष अशोक धवड यांचा जामीन अर्ज एमपीआयडी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयाने खारीज केला. न्या. व्ही. एम. वैद्य यांनी धवड यांना हा दणका दिला.माजी आमदार धवड गेल्या ११ महिन्यापासून गजाआड आहेत. त्यांनी प्रकृती अस्वास्थ्य व कारागृहात कोरोना संक्रमण होण्याची शक्यता लक्षात घेता जामीन देण्याची विनंती केली होती. धवड ६३ वर्षे वयाचे असून आरोग्य अस्वास्थ्यामुळे त्यांना नियमित उपचाराची गरज आहे. तसेच, कोरोना संक्रमण वाढत असल्यामुळे त्यांना कारागृहात धोका आहे. याशिवाय प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली आहे व न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे धवड यांना कारागृहात ठेवण्याची गरज नाही, असा दावा अर्जात करण्यात आला होता. परंतु, न्यायालयाने ठेवीदारांचे हित व घोटाळ्याची गंभीरता लक्षात घेता धवड यांच्यावर दया दाखविण्यास नकार दिला. राज्य सरकार व कारागृह प्रशासन बंदिवानांचे कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करीत आहे. तसेच, अशा प्रकरणांवर शक्यतांच्या आधारावर नाही तर, गुणवत्ता तपासून निर्णय घ्यावा लागतो असे निरीक्षण न्यायालयाने हा निर्णय देताना नोंदवले.या प्रकरणात धवड व इतर आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४२०, ४०६, ४०९, १२०-ब, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७७-ए, एमपीआयडी कायद्यातील कलम ३ व आयटी कायद्यातील कलम ६५ व ६५ (ब) अंतर्गत एफआयआर नोंदविण्यात आला आहे. आरोपींनी बँकेमध्ये ३८.७५ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे चौकशीत आढळून आले आहे. यापूर्वी धवड यांनी अटकपूर्व जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली होती. परंतु, त्यांना कुठेच दिलासा मिळाला नाही. त्यामुळे त्यांना आत्मसमर्पण करावे लागले. धवडतर्फे अ‍ॅड. देवेंद्र चव्हाण यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Ashok Dhawadअशोक धवडCourtन्यायालय