बांग्लादेशच्या विमानाची नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लॅण्डींग

By मंगेश व्यवहारे | Updated: February 20, 2025 12:02 IST2025-02-20T12:02:04+5:302025-02-20T12:02:50+5:30

Nagpur : विमानात ४०० प्रवासी असल्याची माहिती

Bangladesh plane makes emergency landing at Nagpur airport | बांग्लादेशच्या विमानाची नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लॅण्डींग

Bangladesh plane makes emergency landing at Nagpur airport

मंगेश व्यवहारे
नागपूर :
बांग्लादेशच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे या विमानाचे बुधवारी रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय  विमानतळावर इमर्जन्सी लॅण्डींग करण्यात आले. या विमानात ४०० प्रवासी असल्याची माहिती आहे.

विमानाची इमरजन्सी लॅण्डींग होण्यापूर्वी प्रवाश्यांच्या सुरक्षेची खबरदारी म्हणून विमानतळ व्यवस्थापनाने अग्निशमन विभागाला सूचना केली. बुधवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास मिळालेल्या सूचनेनुसार तत्काळ नरेंद्रनगर अग्निशमन केंद्रातून अग्निशमन पथक विमानतळावर रवाना झाले.  स्टेशन अधिकारी घवघवे व उपअधिकारी मरस्कोल्हे यांच्या नेतृत्वात  तैणात पथकाने विमानाची सुरक्षित लॅण्डींग झाल्यानंतर सर्व प्रवाशी सुखरूप बाहेर येईपर्यंत कर्तव्य बजावले.

Web Title: Bangladesh plane makes emergency landing at Nagpur airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.