नायलाॅन मांजा विक्रीवर बंदी घाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:19 IST2021-01-13T04:19:44+5:302021-01-13T04:19:44+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क वाडी : मकरसंक्रांतीनिमित्त सर्वत्र पतंग उत्सवाला उधाण येते. नायलाॅन मांजावर बंदी असताना माेठ्या प्रमाणात छुप्या पद्धतीने ...

नायलाॅन मांजा विक्रीवर बंदी घाला
लाेकमत न्यूज नेटवर्क
वाडी : मकरसंक्रांतीनिमित्त सर्वत्र पतंग उत्सवाला उधाण येते. नायलाॅन मांजावर बंदी असताना माेठ्या प्रमाणात छुप्या पद्धतीने शहरात मांजाची अवैध विक्री केली जाते. या मांजामुळे पशुपक्ष्यांच्या जीवाला धाेका निर्माण झाला आहे. वेळप्रसंगी अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले. त्यामुळे नायलाॅन मांजा विक्रीवर बंदी घालण्यात यावी, या मागणीसाठी युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले व ठाणेदार प्रदीप सूर्यवंशी यांना निवेदन साेपविले.
शहरात छुप्या पद्धतीने हाेणाऱ्या मांजा विक्रीवर प्रतिबंध लावून संबंधित विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. युवासेनेतर्फे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले तर शहर युवतीतर्फे ठाणेदार प्रदीप सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी युवासेना शहरप्रमुख सचिन बाेंबले, समन्वयक शुभम डवरे, प्रीतम नेवारे, शुभम पिसे, नीलेश जाधव, विनीत गजभिये, गौरव मेंढे, अभय ठवकर, करण काचोरे, जतीन भोयर, प्रकाश उके, युवती सेनेच्या श्वेता डवरे, निशा मंडल, नेहा चकोले, विधी कोरे, रितिका कळव, श्रद्धा गोंडेकर, करीना गौडकर, धनश्री वानखेडे, श्रुतिका गौळकर, समीक्षा वानखेडे आदी उपस्थित होते.