बेकरीत लुटमार, कर्मचाऱ्याला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 09:28 IST2020-11-22T09:28:41+5:302020-11-22T09:28:41+5:30

\Sरोख आणि मोबाईल लंपास लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका बेकरीमध्ये आलेल्या गुंडांनी बेकरीच्या कर्मचाऱ्याला ...

Bakery robbery, beating of an employee | बेकरीत लुटमार, कर्मचाऱ्याला मारहाण

बेकरीत लुटमार, कर्मचाऱ्याला मारहाण

\Sरोख आणि मोबाईल लंपास

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका बेकरीमध्ये आलेल्या गुंडांनी बेकरीच्या कर्मचाऱ्याला मारहाण करून काऊंटरमधील तीन हजार रुपये आणि मोबाईल हिसकावून नेला. शुक्रवारी रात्री या प्रकरणी तहसील पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

फिर्यादी मोहम्मद बिलाल मोहम्मद समीर हा संभाजी रोडवरील टिमकी परिसरात असलेल्या रजा बेकरीमध्ये काम करतो. शुक्रवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास तो बेकरीत उभा असताना एक अनोळखी तरुण तेथे आला. तुझा मालक कोण आहे, अशी विचारणा करून तो तिथून लगबगीने बाहेर पडला. बिलालला त्याचा संशय आला. त्यामुळे त्याने आजूबाजूला बघितले असता तेथे ठेवलेला मोबाईल दिसला नाही. संशयित आरोपीने तो चोरला असावा, अशा अंदाज बांधून त्याने त्या तरुणाला हटकले. त्यामुळे आरोपीने फोन करून त्याचे तीन साथीदार बोलावून घेतले. त्या चौघांनी बिलालला बेदम मारहाण केली. बेकरीच्या काऊंटरमध्ये ठेवलेले ३ हजार रुपये आणि मोबाईल हिसकावून आरोपी पळून गेले.

बिलालची आरडाओरड ऐकून शेजारची मंडळी धावत आली. मात्र आरोपी पसार झाले होते. बिलालने तहसील पोलिस ठाण्यात या प्रकरणात तक्रार दाखल केली. पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

---

Web Title: Bakery robbery, beating of an employee