लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘व्हॅलेन्टाईन डे’ला विरोध करण्यासाठी बजरंग दलाकडून बुधवारी दुपारी मोटरसायकलवर इशारा रॅली काढण्यात आली. या रॅलीत बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. ‘व्हॅलेन्टाईन डे’च्या नावाखाली बीभत्सपणा किंवा अश्लीलता दिसून आली तर ते सहन करणार नाही, असा इशारा यावेळी कार्यकर्त्यांकडून देण्यात आला.दरवर्षीप्रमाणे यंदादेखील बजरंग दलातर्फे ‘व्हॅलेन्टाईन डे’च्या विरोधात इशारा रॅली काढण्यात आली. दुपारी ३ च्या सुमारास लोकमत चौकातूनच रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीत कार्यकर्ते विनाहेल्मेट दुचाकी चालवत होते. काही कार्यकर्ते चालत्या मोटरसायकलच्या मागील सीटवर उभे राहून घोषणा देत होते. काही कार्यकर्ते चक्क ‘ट्रिपल सीट’ होते. मात्र या रॅलीविरोधात वाहतूक पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही.प्रेमाला नव्हे अश्लीलतेला विरोधया इशारा रॅलीच्या वेळी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ‘व्हॅलेन्टाईन डे’च्या विरोधात घोषणाबाजी केली. आम्ही प्रेमाचा विरोध करत नाही. मात्र ‘व्हॅलेन्टाईन डे’च्या नावाखाली अश्लीलतेचा प्रसार होत आहे. या पाश्चिमात्य संस्कृतीचा विरोध करण्यासाठीच आम्ही ही भूमिका घेतली आहे, अशी माहिती बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांतर्फे देण्यात आली.
नागपुरात बजरंग दलाचा ‘व्हॅलेन्टाईन’ला इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 21:38 IST
‘व्हॅलेन्टाईन डे’ला विरोध करण्यासाठी बजरंग दलाकडून बुधवारी दुपारी मोटरसायकलवर इशारा रॅली काढण्यात आली. या रॅलीत बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. ‘व्हॅलेन्टाईन डे’च्या नावाखाली बीभत्सपणा किंवा अश्लीलता दिसून आली तर ते सहन करणार नाही, असा इशारा यावेळी कार्यकर्त्यांकडून देण्यात आला.
नागपुरात बजरंग दलाचा ‘व्हॅलेन्टाईन’ला इशारा
ठळक मुद्देमोटरसायकल ‘रॅली’चे आयोजन : वाहतूक नियमांना हरताळ