धार्मिक स्थळांचे बांधकाम हटविण्याला बजरंग दलाचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 00:03 IST2018-06-27T00:02:09+5:302018-06-27T00:03:48+5:30
महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकातर्फे गेल्या चार दिवसापासून शहरातील धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू आहे. परंतु कारवाई करताना भेदभाव केला जात आहे. केवळ मंदिरांचे अतिक्रमण हटविले जात आहे. याला विरोध करून अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या धार्मिक स्थळांच्या यादीतील मशीद, दरगाह यांच्यावर कारवाई करण्यात यावी. यासाठी बजरंग दलातर्फे नागपूर महानगर बजरंग दल संयोजक मनीष मौर्य यांच्या नेतृत्वात मंगळवारी महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढून आयुक्तांना निवेदन सादर केले.

धार्मिक स्थळांचे बांधकाम हटविण्याला बजरंग दलाचा विरोध
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकातर्फे गेल्या चार दिवसापासून शहरातील धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू आहे. परंतु कारवाई करताना भेदभाव केला जात आहे. केवळ मंदिरांचे अतिक्रमण हटविले जात आहे. याला विरोध करून अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या धार्मिक स्थळांच्या यादीतील मशीद, दरगाह यांच्यावर कारवाई करण्यात यावी. यासाठी बजरंग दलातर्फे नागपूर महानगर बजरंग दल संयोजक मनीष मौर्य यांच्या नेतृत्वात मंगळवारी महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढून आयुक्तांना निवेदन सादर केले.
शहरातील धार्मिक स्थळांचे अतिक्रमण काढताना कोणत्याही प्रकारचा भेदभाव करु नये. अशी मागणी केली. मागणी मान्य न केल्यास बजरंग दल स्वत: अतिक्रमण करून उभारण्यात आलेले दरगाह व मशीद यांचे अतिक्रमण काढेल, असा इशारा मौर्य यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून केला आहे. मोर्चात बजरंग दलाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.