शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

तेलगीच्या सापळ्यात अडकला ‘बाहुबली’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 01:53 IST

हजारो कोटींच्या बनावट मुद्रांक घोटाळ्याचा सूत्रधार अब्दुल करीम लाडसाहेब तेलगी काही राजकारणी आणि काही पोलीस अधिकाºयांसोबत अंडरवर्ल्डलाही हाताशी धरून होता, हे सर्वश्रुत आहे.

ठळक मुद्देपोलीस बनले दबंग : महाराष्टÑासह आंध्रच्या राजकारणातही वादळ

नरेश डोंगरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हजारो कोटींच्या बनावट मुद्रांक घोटाळ्याचा सूत्रधार अब्दुल करीम लाडसाहेब तेलगी काही राजकारणी आणि काही पोलीस अधिकाºयांसोबत अंडरवर्ल्डलाही हाताशी धरून होता, हे सर्वश्रुत आहे. मात्र, तो या मंडळींना (त्याला ब्लॅकमेल करू पाहणाºयांना) ‘ट्रॅप’ करीत होता, हे धक्कादायक वास्तव तेलगीला अटक केल्याच्या दोन वर्षांनंतर उघड झाले. त्यावेळी (१९९९ ते २००३ या कालावधीत) आंध्र प्रदेशात मोठा राजकीय प्रभाव असलेल्या एका डॉनला तेलगीने अशाच प्रकारे सापळा लावून अडकवले होते. महाराष्टÑ पोलिसांनी त्यावेळी केलेल्या नाट्यमय कारवाईमुळे महाराष्टÑच नव्हे तर आंध्रातील राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली होती.बनावट मुद्रांक छापून खोºयाने नोटा ओढणाºया तेलगीला राजकीय आणि गुन्हेगारी जगतातून पाठबळ मिळत होते. परंतु त्याला काही जण ब्लॅकमेलही करीत होते. तेलगीला विशेष तपास पथकाने (एसआयटी) ताब्यात घेतल्यानंतर त्याने दडवून ठेवलेली संपत्ती अन् रोकड मिळवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने ठिकठिकाणचे काही ‘भाई लोक‘ धावपळ करीत होते.तर, एसआयटी देखील तेलगीच्या पापाची दडलेली पाळमुळं खणून काढण्याच्या कामी लागली होती. एसआयडीचे तपास अधिकारी (सेकंड आय. ओ.) पुरुषोत्तम चौधरी यांनी तेलगीची चौकशी करताना त्याला कडेकोट बंदोबस्तात त्याच्या मुंबईतील ताज हॉटेलच्या मागे असलेल्या आलिशान सदनिकेत नेले. तेथे झाडाझडती घेताना चौधरी आणि त्यांच्या सहकाºयांना एक सीडी मिळाली. ती जप्त केल्यानंतर तपास अधिकाºयांनी त्यातील संभाषण ऐकले. तेलगीला हैदराबादमधील एक बाहुबली (गँगस्टर) वारंवार खंडणीसाठी धमकावत होता अन् रक्कम उकळत होता, अशा आशयाचे त्यात संभाषण होते. त्या बाहुबलीने तेलगीकडून प्रचंड मोठी रक्कम उकळली असल्याचे संभाषणातून पुढे आल्यामुळे एसआयटीने त्याच्या मुसक्या बांधण्याची तयारी केली.हैदराबादेत दंग्याची भीतीत्याचा त्रास वाढल्यामुळेच तेलगीने त्याचे धमकीचे फोन टेप करून ठेवले होते. त्याचीच ती कॅसेट होती. तेलगीकडून खंडणी उकळणाºया आंध्रातील त्या डॉनचा गुन्हेगारी जगतासह राजकीय क्षेत्रातही प्रचंड दबदबा होता. त्यामुळे त्याला कधी अन् कशा पद्धतीने अटक करायची, असा एसआयटीच्या अधिकाºयांसमोरचा प्रश्न होता. त्याला अटक केल्यानंतर प्रचंड विरोध होणार, पोलिसांवर हल्ला होण्याचाही धोका होता. हे सर्व ध्यानात घेत अतिरिक्त पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, पोलीस अधीक्षक छत्रपती वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरुषोत्तम चौधरी आणि पथकाने बाहुबलीच्या अटकेसाठी अ‍ॅक्शन प्लान तयार केला. त्यानुसार, चौधरी यांच्या नेतृत्वात पाच जणांचे पथक हैदराबादला पोहचले. तेथील तत्कालीन पोलीस महासंचालकांना (डीजी) तपास पथकाने आपल्या हैदराबाद दौºयाचे कारण सांगितले तेव्हा डीजीदेखिल स्तंभित झाले. मात्र, त्यांनी गोपनीयता बाळगण्याचा सल्ला देऊन काही दिवस वाट पाहा, असे म्हटले. बाहुबलीला अटक केल्यानंतर हैदराबादेत दंगे होऊ शकतात, हे ध्यानात घेत डीजींच्या आदेशानुसार प्रचंड पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. त्यानंतर पोलीस अधिकारी चौधरी आणि त्यांच्या सहकाºयांनी तब्बल चार दिवस बाहुबलीच्या दिनचर्येचा अभ्यास केला. पाचव्या दिवशी भल्यासकाळी बाहुबली मॉर्निंग वॉकला निघाला असता त्याच्यावर झडप घालून त्याच्या मुसक्या बांधण्यात आल्या. एसआयटीच्या पथकाने त्याला आपल्या वाहनात कोंबले आणि पुण्यात आणले.कोण होता बाहुबली?कृष्णा यादव असे त्या बाहुबलीचे नाव होते. मोठी फौज पाठीशी असलेला यादव हा माजी आमदार होता. त्याच्या अटकेचे वृत्त कळताच त्यावेळी आंध्र प्रदेशसोबत महाराष्ट्राच्या राजकारणातही प्रचंड खळबळ उडाली होती. हैदराबादमध्ये दंगे होण्याची स्थिती निर्माण झाली होती. मात्र, आधीच प्रचंड पोलीस बंदोबस्त लावण्यात आला त्यामुळे फारसे काही विपरीत घडले नाही. मात्र, महाराष्ट्र पोलिसांवर अपहरणाचा आरोप लावण्यात आला होता. वरिष्ठ पातळीवरून सर्व प्रकारची कायदेशिर प्रक्रिया आधीच पूर्ण करून घेण्यात आल्यामुळे तो आरोप अन् बाहुबली यादवची पाठराखण करणारांचा विरोध गळून पडला. दरम्यान, ती कॅसेट चौकशीसाठी तज्ज्ञांकडे पाठविण्यात आली. त्यातील आवाज तेलगी अन् यादवचाच असल्याचे स्पष्ट झाले. प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर यादव तब्बल तीन वर्षे पुण्याच्या कारागृहात बंदिस्त होता. त्याला अटक केल्यानंतर तेलगीने तपास अधिकाºयांकडे एक बडा मासा तुम्हाला पकडून दिला असे म्हटले होते.