शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बॅग विक्रेत्याची नागपुरातील सक्करदऱ्यात हत्या : तलवारीचे घाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 21:32 IST

दुकानाच्या अतिक्रमणाचा गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेला वाद एका व्यापाऱ्याच्या जीवावर बेतला. बाजूलाच राहणाऱ्या गुंड बापलेकाने बॅग विक्रेते हरिभाऊ रामभाऊ सावरकर (वय ५५) यांच्यावर तलवारीचे घाव घालून त्यांची हत्या केली.

ठळक मुद्देआरोपी गुंड बापलेक फरार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दुकानाच्या अतिक्रमणाचा गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेला वाद एका व्यापाऱ्याच्या जीवावर बेतला. बाजूलाच राहणाऱ्या गुंड बापलेकाने बॅग विक्रेते हरिभाऊ रामभाऊ सावरकर (वय ५५) यांच्यावर तलवारीचे घाव घालून त्यांची हत्या केली. मंगळवारी दुपारी ४.३० च्या सुमारास सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भांडे प्लॉट परिसरात ही थरारक घटना घडली. यामुळे परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बंटी ऊर्फ शेरखान नूरखान शेख आणि त्याचा बाप नूरखान शेख अशी आरोपींची नावे आहेत. हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाले.भांडे प्लॉट परिसरात लक्ष्मी कॉम्प्लेक्स नामक इमारत आहे. या इमारतीत व्यापाऱ्यांची वेगवेगळे दुकाने आहे आणि डॉक्टर व अन्य व्यावसायिकही तेथे ते आपली सेवा देतात. इमारतीच्या खालच्या भागात आरोपी बंटी आणि त्याचा बाप नूरखान शेख या दोघांनी प्रारंभी एचबीटी नावाने मटन चिकनचे हॉटेल सुरू केले होते. ते या भागात सर्वत्र घाण करून ठेवत असल्याने आरोपींना इमारतीतील दुकानदारासह बाजूच्या नागरिकांनी प्रचंड विरोध केला. त्यामुळे आरोपींना ते दुकान बंद करावे लागले. परिणामी आरोपी कमालीचे चिडले होते. ते कुणाही सोबत वाद घालायचे आणि त्यांना मारहाण करायचे.मंगळवारी त्यांनी बॅगविक्रेता हरिभाऊ सावरकर यांच्यासोबत वाद सुरू केला. त्यांच्या घरापासून काही अंतरावर दुपारी ४.३० च्या सुमारास आरोपी बंटी आणि त्याचा बाप नूरखान शेख या दोघांनी सावरकर यांच्यावर तलवारीने हल्ला चढवून त्यांची भीषण हत्या केली. भररस्त्यावर हा थरारक प्रकार घडल्यानंतर परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले. लॉकडाऊन असूनही प्रचंड गर्दी तेथे जमली. माहिती कळताच सक्करदरा पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला व जमावाला शांत केले.वादाला बिल्डरही कारणीभूत ?गेल्या दीड-दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या जीवघेण्या वादाला ही इमारत बांधणारा बिल्डरही कारणीभूत असल्याची जोरदार चर्चावजा आरोप संतप्त नागरिकांमध्ये होता. बिल्डरने पार्किंगची जागा गुंड बापलेकाला विकली. त्यामुळेच हा वाद सुरू झाला. तो टोकाला गेल्यानंतर बिल्डरने वाद निकाली काढण्याऐवजी आपली जबाबदारी झटकली. त्याचमुळे हे गुंड बापलेक वारंवार तेथील व्यापाऱ्यांवर हल्ला करून दहशत पसरवत होते.

टॅग्स :Murderखूनnagpurनागपूर