पोटावर चटके दिलेले बाळ सुखरुप ; प्रशासनासह डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे बाळाला मिळाले नवे आयुष्य

By सुमेध वाघमार | Updated: March 28, 2025 19:08 IST2025-03-28T19:07:54+5:302025-03-28T19:08:33+5:30

Nagpur : हृदयावरील गुंतागुंतीची शस्त्रक्रिया झाली यशस्वी

Baby who was hit on the stomach is safe; Thanks to the tireless efforts of the administration and doctors, the baby got a new life | पोटावर चटके दिलेले बाळ सुखरुप ; प्रशासनासह डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे बाळाला मिळाले नवे आयुष्य

Baby who was hit on the stomach is safe; Thanks to the tireless efforts of the administration and doctors, the baby got a new life

सुमेध वाघमारे 
नागपूर :
चिखलदरा तालुक्यातील सिमोरी येथील राजू व फुलवंती धिकार या दाम्पत्याच्या २२ दिवसांच्या बाळाच्या पोटावर चटके दिल्याने अत्यंत गंभीर स्थितीत नागपूरच्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तपासणीत फुफ्फुसाचा विकारासोबतच रक्तातील संसर्ग व ‘टीजीए’सारख्या हृदय विकाराचेही निदान झाले. डॉक्टरांनी  उपचार सुरू करून बाळाची प्रकृती स्थिर केली. त्यानंतर गुंतागुंतीची हृदय शस्त्रक्रिया यशस्वी केली. एकूणच प्रशासनासह डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे बाळाला नवे आयुष्य मिळाले.
     

बाळाचा जन्म ३ फेब्रुवारी रोजी अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात झाला आणि ५ फेब्रुवारी रोजी डिस्चार्ज मिळाला. नंतर बाळाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, त्यामुळे २३ फेब्रुवारी रोजी आईने घरगुती उपाय म्हणून बाळाच्या पोटावर जवळपास ६० ते ६५ वेळा गरम लोखंडी सळईने चटके दिले. नंतर बाळाला अमरावती येथील महिला रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागात दाखल केले. २६ फेब्रुवारी २०२५ रोजी पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी चटके देण्यात आल्याची बाब गंभीरतेने घेत चौकशीचे आदेश दिले. पोलिस अधीक्षक आनंद यांनी ही माहिती पालकमंत्री  बावनकुळे यांना दिली. त्यांनी बाळाच्या उपचारास प्राधान्य देण्याचे व त्याच्या जीवितास धोका होऊ नये म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. दरम्यान बाळाची प्रकृती अत्यंत गंभीर झाली. त्यामुळे  पुढील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी नागपूरच्या नेल्सन हॉस्पिटलमध्ये नेण्याचा निर्णय घेण्यात आला. २७ फेब्रुवारी रोजी ‘ग्रीन कॉरिडॉर’च्या मदतीने या हॉस्पिटलमध्ये  दाखल करण्यात आले. 

पहिले दहा दिवस महत्त्वाचे 
सलग एक महिन्याच्या उपचारानंतर या बाळाला उद्या शनिवारी सुटी होणार आहे. बाळावर केलेल्या उपचाराची माहिती देताना नेल्सन हॉस्पिटलचे संचालक डॉ. सोनल भगत यांनी सांगितले, बाळाला नवजात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्याची प्रकृती अत्यंत गंभीर होती. पहिले दहा दिवस महत्त्वाचे होते. शर्थीच्या उपचारानंतर बाळाची प्रकृती स्थिर झाली. आता आव्हान ‘ट्रान्सपोझिशन आॅफ ग्रेट आर्टरीज’वरील (टीजीए) शस्त्रक्रिया होती. ही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची होती. परंतु डॉक्टरांनी आपले अनुभव व कौशल्यपणाला लावून ती यशस्वी केली. 

पाच हजारातून एकाला ‘टीजीए’ आजार
पेडियाट्रिक हार्ट सर्जन डॉ. सचिन कुथे यांनी सांगितले, ‘टीजीए’ हा जन्मजात आजार आहे. साधारण पाच हजार बालकांमधून एकाला हा आजार होतो. या आजारात हृदयातून निघणारे दोन मुख्य धमनी, महाधमनी आणि फुफ्फुसीय धमनीची जाग बदलेली असते. यावर शस्त्रक्रिया हाच पर्याय असतो. 

आरबीएसके’मधून नि:शुल्क उपचार
या बाळावरील हृद शस्त्रक्रिया राष्टÑीय बाल स्वास्थ आरोग्य कार्यक्रमामधून (आरबीएसके) नि:शुल्क करण्यात आली. या बाळावर डॉ. कुथे यांच्यासह डॉ. विनय कुलकर्णी, डॉ. सतीश देवपुजारी, डॉ. निलेश दारव्हेकर, डॉ. सुचिता खडसे, डॉ. यश बनायत, डॉ. अनुपम बाहे, डॉ. निकिता लालवानी, डॉ. पियुष मालोकर यांनी उपचार केले तर यात सहकार्य राधा साहू, गणेश खरोडे व डॉ. एस. पी. राजन यांनी केले.

Web Title: Baby who was hit on the stomach is safe; Thanks to the tireless efforts of the administration and doctors, the baby got a new life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर