शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

श्वासही घेऊ शकत नव्हते जीव, बाळांना मिळाले चमत्कारीक जीवनदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 07:34 IST

मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात हा चमत्कार झाला. 

सुमेध वाघमारे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तिच्या पोटात तिळे. नऊ महिने नऊ दिवस पूर्ण होण्यापूर्वीच जन्माला आले. वजन दीड किलो. श्वासही स्वत:हून घेता येईना. मात्र डॉक्टर, परिचारिकांनी शर्थीचे प्रयत्न केल्याने  तिळ्यांना जीवदान मिळाले. शासकीय मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात हा चमत्कार झाला. 

नयनपूर मंडला (मध्य प्रदेश) येथील ओमीट देवेंद्र ठाकूर (२४) पहिल्याच प्रसूतीसाठी मेडिकल इस्पितळात दाखल झाल्या. बाळांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये, म्हणून त्याच दिवशी तत्काळ सिझेरियनचा निर्णय डॉक्टरांनी घेतला.

एक बाळ न्युओनेटल व्हेंटिलेटरवर, दोन ऑक्सिजनवर n‘एनआयसीयू’चे डॉ. अभिषेक मधुरा यांनी ‘लोकमत’ला सांगितले, साधारण बाळाचे वजन अडीच किलोपेक्षा जास्त असणे गरजेचे असते. परंतु, तिळ्यांचे वजन दीड किलोपेक्षाही कमी होते. n १.३०० ग्रॅम वजनाचे एक बाळ फारच गंभीर होते. फुफ्फुस विकसित झाले नसल्याने त्याला श्वासही घेता येत नव्हता. त्यामुळे त्याला न्युओनेटल व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. nदुसरे आणि तिसरे बाळ स्वत:हून श्वास घेत असले तरी त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते.

बाळांचे वजन कमी मुदतपूर्व जन्मास आलेल्या तिन्ही अर्भकांचे वजन कमी होते. पहिल्या आणि दुसऱ्या बाळाचे वजन प्रत्येकी १.३०० ग्रॅम आणि तिसऱ्याचे वजन १.४०० ग्रॅम. तीनही मुले आहेत. तिघांनाही तत्काळ ‘एनआयसीयू’मध्ये दाखल करण्यात आले.

दोन बाळांना नुकतेच त्यांच्या आईकडे देण्यात आले. व्हेंटिलेटरवर असलेले पहिले बाळ एनआयसीयूमध्ये आहे. लवकरच त्यालाही आईकडे सुपूर्द केले जाईल. एका बाळाच्या फुफ्फुसासाठी महागडे ‘सरर्फेक्टंट’ इंजेक्शन देणे गरजेचे होते. अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी तत्काळ औषधी उपलब्ध करून दिली.- डॉ. अभिषेक मधुरा 

टॅग्स :nagpurनागपूरdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल