शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
2
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
3
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
4
₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
5
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
6
Budh Gochar 2025: वक्री गेलेला बुध मार्गी लागला; पुढील दोन वर्षात कोणकोणते लाभ देणार? वाचा!
7
"एकीकडे जवान सीमेवर शहीद होतायत अन् आपण IND vs PAK क्रिकेट..."; हरभजन सिंगचा संताप
8
कुस्तीपटू सुशील कुमारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, रद्द केला जामीन, कारण काय?
9
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
10
इतका कसला राग? सासूला मारलं अन् १९ तुकडे १९ ठिकाणी फेकले; जावई इतका निर्दयी का झाला?
11
मतचोरीविरोधात वाराणसीत अजब आंदोलन; पराभूत काँग्रेस उमेदवाराच्या नावाने जल्लोष
12
पाकविरुद्ध १२ वर्षांपूर्वी धडाडली होती स्टेन'गन'! Jayden Seales नं वनडेतील तो वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
13
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
14
Lunchbox Recipe: ढोबळी मिरचीची 'अशी' करा पीठ पेरून भाजी; कोरडी नाही लागणार, डब्यातही नेता येणार 
15
म्युच्युअल फंड-स्टॉक नाही! 'या' ठिकाणी पैसे गुंतवण्यासाठी लोकांचा कल वाढला, पाहा तुमच्याकडे संधी आहे का?
16
६ शिफ्टमध्ये २८ मंत्र्यांची ड्युटी...यूपी विधानसभेत २४ तासांचं ऐतिहासिक कामकाज, कारण काय?
17
Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
18
ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स...
19
जगाच्या नकाशावरचा 'हा' देश बनलाय भूकंपाचं केंद्र; दर तासाला जाणवतात १८ भूकंपाचे झटके!
20
३ वर्षांपूर्वी बिझनेसला सुरुवात! आता थेट गुगलला क्रोम ब्राउझर खरेदी करण्याची ऑफर; कोण आहे अरविंद श्रीनिवास?

बाबासाहेब जागतिक स्त्रीमुक्तीचे उद्धारक

By admin | Updated: June 20, 2016 02:47 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील स्त्रीमुक्तीचे उद्धारक आहेत. त्यामुळे जगभरातील महिलांनी त्यांचे ऋण मानावे, ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलन : प्रसिद्ध दिग्दर्शक जब्बार पटेल यांचे प्रतिपादननागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील स्त्रीमुक्तीचे उद्धारक आहेत. त्यामुळे जगभरातील महिलांनी त्यांचे ऋण मानावे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी येथे केले. प्रगतिशील लेखक संघ, संविधान फाऊंडेशन आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तर अंबाझरी मार्गावरील अमृतभवन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाचे उद्घाटक म्हणून डॉ. जब्बार पटेल बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे होते तर भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर हे प्रमुख अतिथी होते. ज्येष्ठ नेते डॉ. भालचंद्र कांगो, संविधान फाऊंडेशनचे अध्यक्ष ई.झेड. खोब्रागडे, ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव सुनील पाटील, सुनीता झाडे व महेंद्रकुमार मेश्राम व्यासपीठावर होते. डॉ. जब्बार पटेल म्हणाले, महिलांच्या अधिकारासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एका झटक्यात मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. तसेच गरोदर महिलांना हक्काची रजा मिळवून देणारे बाबासाहेब हे जगातील पहिलेच व्यक्ती आहेत. त्यानंतर अनेक देशांनी आपापल्या देशामध्ये गरोदर महिलांसाठी सुटी लागू केली. राज्यघटना तयार करणारा, आरक्षण मिळवून देणारा, गांधीजींशी भांडणारा माणूस म्हणून बाबासाहेब आपल्याला परिचित होते. परंतु बाबासाहेबांवर चित्रपट करीत असताना जेव्हा देशभरासह जगभरात फिरलो तेव्हा बाबासाहेब काय होते, हे खऱ्या अर्थाने कळले. तेव्हा बाबासाहेब समजून घेताना एकेक धक्का बसत गेला. इतक्या मोठ्या उंचीचे ते व्यक्तिमत्त्व होते. कोलंबिया विद्यापीठात जेव्हा मी बाबासाहेबांवर चित्रपट करीत असल्याचे समजले तेव्हा तेथील प्रशासनाने आपल्याकडून एक पैसाही न घेता संपूर्ण मदत केली. तेव्हा त्यांच्या मनात बाबासाहेबांबद्दल किती सन्मान आहे, हे दिसून आले. राज्यघटनेला ५० वर्षे पूर्ण झाली होती; तेव्हा इंग्लंडमध्ये संविधानावर चर्चा ठेवण्यात आली होती. त्यात जगभरातील संविधानाचे तज्ज्ञ, अभ्यासक उपस्थित होते. अध्यक्षस्थानी इंग्लंडचे सर्वोच्च न्यायाधीश होते. त्या चर्चेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेली राज्यघटना ही सर्वश्रेष्ठ असून त्यात एक अक्षरसुद्धा बदलण्याची गरज नाही, असे मत व्यक्त करण्यात आले होते. यावरून भारतीय राज्यघटनेची सर्वश्रेष्ठता सिद्ध होते, असेही डॉ. पटेल यांनी स्पष्ट केले. ई.झेड. खोब्रागडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी भूमिका विशद केली. अजय गंपावार यांनी संचालन केले, तर प्रसेनजित ताकसांडे यांनी आभार मानले. समारोपाला ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे उपस्थित होते. ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे अध्यक्षस्थानी होते. ई. झेड. खोब्रागडे, सुनील पाटील,डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, इंद्रजित ओरके व्यासपीठावर होते. (प्रतिनिधी)गांधींविरुद्ध आंबेडकर हे आरएसएसचे षङ्यंत्र महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष हा वैचारिक होता. परंतु या दोन्ही महापुरुषांनी एकमेकांना घडविले आहे. हा इतिहास आहे. परंतु गांधींविरुद्ध आंबेडकर असे भांडण लावून आपसात लढवत ठेवणे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे षङ्यंत्र आहे, हे षङ्यंत्र हाणून पाडा, असे आवाहन डॉ. रावसाहेब कसबे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. सोशल मीडियामध्ये ‘इंटेलेक्च्युअल फोरम’ तयार व्हावा आज बाबासाहेबांच्या विचारांवर घाला घालण्याचे प्रकार होत असेल तर त्याविरोधात प्रखरतेने बोलले गेले पाहिजे. फुले-शाहू-आंबेडकरी विचारवंतांनी व अनुयायांनी एकजुटीने बोलावे. यासाठी सोशल मीडियावर एक इंटेलेक्च्युअल फोरम तयार व्हावा. एखाद्याने चुकीचे विचार मांडले असेल तर त्याला तर्कसंगतपणे उत्तर दिले गेले पाहिजे, अशी अपेक्षा डॉ. जब्बार पटेल यांनी व्यक्त केली.