बाबासाहेबांनी आज घेतली होती दीक्षा
By Admin | Updated: October 14, 2015 03:33 IST2015-10-14T03:33:43+5:302015-10-14T03:33:43+5:30
१४ आॅक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्मक्रांती झाली होती. याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पवित्र दीक्षाभूमी येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती.

बाबासाहेबांनी आज घेतली होती दीक्षा
दीक्षाभूमीवर जय्यत तयारी : लाखो अनुयायी अस्थिकलशाचे दर्शन घेणार
रिता हाडके नागपूर
१४ आॅक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्मक्रांती झाली होती. याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पवित्र दीक्षाभूमी येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. तो दिवस विजयादशमीचा होता. त्यामुळे बौद्ध अनुयायी १४ आॅक्टोबर व विजयादशमीच्या दिवशी ‘धम्मचक्र प्रवर्तन’ दिन उत्साहात साजरा करतात. त्यानुसार उद्या (बुधवारी) दीक्षाभूमीवर बाबासाहेबांच्या अस्थिकलशाच्या दर्शनासाठी लाखोंची गर्दी होणार आहे. याशिवाय विजयादशमीच्या दिवशी पुन्हा देश-विदेशातील लाखो बौद्ध अनुयायी येथे येणार आहेत. यासाठी दीक्षाभूमीवर जय्यत तयारी करण्यात आली आहे. दरवर्षी १४ आॅक्टोबर रोजी विशेषत: स्थानिक लाखो बौद्ध अनुयायी दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेबांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतात.
विजयादशमीच्या दिवशी बाहेरू न येणाऱ्यांची प्रचंड गर्दी होते. त्यामुळे देश-विदेशातून येणाऱ्या बौद्ध अनुयायांना दर्शन घेता यावे, हा सुद्धा यामागील उद्देश असतो. उद्या सकाळी दीक्षाभूमी विहारातील भिख्खु सुगत बोधी यांच्या नेतृत्वात बुद्धवंदना होईल. तसेच उपासक-उपासिकांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे महत्त्व सांगितले जाईल. या महोत्सवासाठी दीक्षाभूमीपुढील फुटपाथवर अनेक दुकाने सजली आहेत. शिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने येथे ठिकठिकाणी नळ लावून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.