‘अझोला’मुळे जनावरांना मिळणार पोषक आहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:08 IST2021-05-23T04:08:42+5:302021-05-23T04:08:42+5:30
रामटेक : ‘अझोला कल्चर’द्वारा बेड तयार करून जी वनस्पती तयार होईल. त्याचा फायदा जनावरांसाठी पशुखाद्य व शेतात त्याचा उपयोग ...

‘अझोला’मुळे जनावरांना मिळणार पोषक आहार
रामटेक : ‘अझोला कल्चर’द्वारा बेड तयार करून जी वनस्पती तयार होईल. त्याचा फायदा जनावरांसाठी पशुखाद्य व शेतात त्याचा उपयोग केल्यास उत्तम खत म्हणून करणे शक्य आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लागवडीचा खर्च कमी येतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा, असे आवाहन कृषी अधिकारी स्वप्निल माने यांनी केले आहे.
अझोला मध्ये कॅल्शियम, फॉस्परस, पोटॅशियम, लोह, तांबे, मॅग्नेशियम हे उपयुक्त खनिज पदार्थ परिपूर्ण असतात. उच्च प्रथिने निम्न लीलीन मात्रा असल्याने जनावरांस सुलभतेने पचते. अझोला घनआहारात मिसळून जनावरांना देऊ शकतो. जनावरांचा चारा गुणकारी व परिणामकारक बनविला जातो. अझोला कल्चर हे कृषी विभागाकडे उपलब्ध आहे. रामटेक तालुक्यात कृषी मित्राच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविला जाणार आहे. अझोला ही वनस्पती जनावरांना फायदेशीर आहे. शेतीमध्ये हे टाकले की जमिनीत रासायनिक खताची मात्रा कमी लागते. पिकाची वाढ जोमाने होते.
--
अशी आहे पद्धत
जमिनीत २ मीटर लांबी, १ मीटर रुंदीचा व २० सेमी खोल खड्डा तयार करावा. त्यात खतांच्या रिकाम्या पिशव्या झाकाव्यात. एक पातळ युव्ही स्टॅबिलायईझड प्लास्टिकची सिलपॉलीन शीट पूर्ण खड्डा झाकेल अशी टाकावी. या शिटवर १० ते १५ किलो बारीक माती टाकावी.
१० लीटर पाण्यात २ किलो गाईचे शेण व ३० ग्रॅम सुपर फॉस्फेट यांचे मिश्रण करून ते मातीवर टाकावे. पाण्याची पातळी १० सेमीपर्यंत पोहोचेल एवढे पाणी टाकावे. या पाण्यात अर्धा ते १ किलो शुद्ध व ताजे अझोला कल्चर पसरवून त्यावर थोडे पाणी शिंपडावे.
एक-दोन आठवड्यातच ५ ते २० सेमी जाड अझोला गादीसारखे सर्वत्र पसरते. २० ग्रॅम सुपर फॉस्फेट आणि १ किलो गाईचे शेण ५ दिवसात मिसळावे, त्यामुळे अझोलाची लवकर वाढ होते आणि रोजची ५०० ग्रॅमची उपज कायम राहते.
--
खुमारी येथे अझोला बेड तयार करून त्यात अझोला कल्चर टाकण्यात आले. रामभाऊ विलास पडे यांच्या शेतात हा प्रयोग करण्यात आला. शेतकऱ्यांनी हे बघून आपल्या शेतात हा प्रकल्प राबवावा. याला खर्चही कमी येतो.
- स्वप्निल माने, कृषी अधिकारी