मनपातील कम्पाऊं डर होणार आयुर्वेद वैद्य

By Admin | Updated: September 18, 2015 02:50 IST2015-09-18T02:50:59+5:302015-09-18T02:50:59+5:30

महापालिकेच्या आरोग्य विभागात आयुर्वेद कम्पाऊं डर पदावर कार्यरत परंतु बीएएमएस पदवी प्राप्त केलेल्यांना आयुर्वेद वैद्य या पदावर पदोन्नती दिली जाणार आहे.

Ayurveda Vaidya will be afraid of the Kampouen of the Municipal Corporation | मनपातील कम्पाऊं डर होणार आयुर्वेद वैद्य

मनपातील कम्पाऊं डर होणार आयुर्वेद वैद्य

१७ पदे भरणार : प्रस्ताव सभागृहात मांडणार
नागपूर : महापालिकेच्या आरोग्य विभागात आयुर्वेद कम्पाऊं डर पदावर कार्यरत परंतु बीएएमएस पदवी प्राप्त केलेल्यांना आयुर्वेद वैद्य या पदावर पदोन्नती दिली जाणार आहे. बुधवारी होणाऱ्या मनपाच्या सभेत याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.
मनपाच्या आरोग्य विभागातील आयुर्वेद वैद्यची १७ पदे भरली जाणार आहेत. यातील ७५ टक्के पदे जाहिरातीद्वारे तर २५ टक्के पदोन्नतीने भरण्याचा प्रस्ताव आहे. आयुर्वेद कम्पाऊं डर या पदावरून पदवीधर वैद्य पदावर पदोन्नती करावयाची असल्यास जे बीएएमएस अशी शैक्षणिक पात्रता धारण करीत असेल व १० वर्षांचा अनुभव असेल अशांनाच यासाठी पात्र धरले जाणार आहे.
मनपाच्या आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या काही आयुर्वेद कम्पाऊं डर यांच्याकडे आयुर्वेदिक विशारद, वैद्य विशारद व आयुर्वेद रत्न अशा स्वरूपाच्या पदव्या आहेत. परंतु त्या आयुर्वेद वैद्य पदासाठी ग्राह्य धरता येणार नाही, असा अभिप्राय शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांनी दिला आहे. १९७१ सालापासून भारतात बीएएमएस ही आयुर्वेदाची एकमेव पदवी आहे. याव्यतिरिक्त कोणतीही पदवी यासाठी ग्राह्य धरली जाणार नाही.
मनपाच्या आरोग्य विभागातील मलवाहक जमादार या पदावर पदोन्नतीबाबत धोरण ठरविण्याचा प्रस्ताव सभागृहात मांडला जाणार आहे.
जे सफाई कर्मचारी दहावी पास असून एस.आय. कोर्स केलेला आहे, अशा कर्मचाऱ्यांकरिता ५० टक्के जागा पदोन्नतीने, ज्येष्ठता, योग्यता व आरक्षण लक्षात घेता पदोन्नती राखून ठेवण्याचा यात समावेश आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Ayurveda Vaidya will be afraid of the Kampouen of the Municipal Corporation