संविधानाचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:00 IST2020-11-28T04:00:01+5:302020-11-28T04:00:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गुरुवारी संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. राजकीय पक्ष, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व ...

Awakening of the Constitution | संविधानाचा जागर

संविधानाचा जागर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : गुरुवारी संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. राजकीय पक्ष, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व विविध संघटनांतर्फे तसेच शासकीय कार्यालयांमध्ये संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच दीक्षाभूमीवर जाऊनही अनेकांनी अभिवादन केले. यासोबतच कुणी सामूहिक तर कुणी ऑनलाईन पद्धतीने घरोघरी संविधान प्रास्ताविकेचे वाचन करीत संविधानाचा जागर केला.

संविधान फाऊंडेशन

संविधान फाऊंडेशनतर्फे गुरुवारी सकाळी संविधान प्रास्ताविके ऑनलाईन वाचन करण्यात आले. यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी सनदी अधिकारी ई.झेड. खोब्रागडे, रेखााताई खोब्रागडे, प्रा. डॉ. महेंद्रकुमार मेश्राम, दीपक निरंजन, दिगंबर गोंडाणे, क्रांती खोब्र्रागडे, डॉ. जीवन बच्छाव, शिरीष कांबळे, विजय बेले, छाया मेश्राम, श्रीकांत के.एस., प्रीतीश निरंजन, निर्जरा मेश्राम, मेघल बेले आदी उपस्थित होते.

पीडब्ल्यूएस महाविद्यालय

पीडब्ल्यूएस कला, वाणिज्य महाविद्यालय कामठी रोड येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी डॉ. जयंत जांभुळकर, प्रा. परााग कोपुलवार, प्रा. राहुल वासनिक, प्रा. अनिल गोंडाणे, प्रा. रमेश येल्ले, कैलास गाायकवाड उपस्थित हाेते.

महावितरण

भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून महावितरण कार्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. काटोल रॊड येथील महावितरणच्या प्रादेशिक संचालक कार्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रादेशिक संचालक (प्रभारी) सुहास रंगारी यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करवून घेतले.

यावेळी नागपूर (परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, महाव्यवस्थापक शरद दाहेदार,अधीक्षक अभियंता हरिष गजबे,नारायण आमझरे, अजय खोब्रागडे ,सहाय्यक महाव्यवस्थापक रुपेश सहारे, प्रदीप सातपुते ,उप महाव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) प्रमोद खुळे, कार्यकारी अभियंता दीपाली माडेलवर, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे , प्रणाली विशेलषक प्रवीण काटोले आदी उपस्थित होते.

Web Title: Awakening of the Constitution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.