शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
2
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
3
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
4
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
5
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
6
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
7
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
8
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
9
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
10
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
12
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...
13
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
14
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
15
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
16
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
17
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
18
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
19
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
20
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या

तेलाच्या पिंपाद्वारे अ‍ॅटोमॅटिक हॅन्ड सॅनिटायझर मशीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 23:50 IST

गरज ही शोधाची जननी आहे, असे म्हणतात. पाटणसावंगीतील एका कनिष्ठ महाविद्यालयात शिकविणाऱ्या प्राध्यापकाने ही बाब पुन्हा एकदा स्पष्ट सिद्ध केली. प्रा. निखिल मानकर नामक या प्राध्यापकांनी चक्क तेलाच्या पिंपाला इलेक्ट्रॉनिक्स सर्किट जोडून अतिशय नाममात्र खर्चात अ‍ॅटोमॅटिक हॅन्ड सॅनिटायझर मशीन तयार केली आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : गरज ही शोधाची जननी आहे, असे म्हणतात. पाटणसावंगीतील एका कनिष्ठ महाविद्यालयात शिकविणाऱ्या प्राध्यापकाने ही बाब पुन्हा एकदा स्पष्ट सिद्ध केली. प्रा. निखिल मानकर नामक या प्राध्यापकांनी चक्क तेलाच्या पिंपाला इलेक्ट्रॉनिक्स सर्किट जोडून अतिशय नाममात्र खर्चात अ‍ॅटोमॅटिक हॅन्ड सॅनिटायझर मशीन तयार केली आहे.प्रा. मानकर यांचा हा प्रयोग सध्या त्यांच्या निवासी परिसरात आणि कॉलेजमध्येही चर्चेचा विषय ठरला आहे. कोविड महामारीच्या काळात हातांना निर्जंतुक करणाऱ्या सॅनिटायझरचे महत्त्व वाढले आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना सॅनिटायझर सोबत असणे ही जीवनावश्यक गरज झाली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने लॉकडाऊन नंतर सुरू झालेली शासकीय कार्यालये आणि खासगी आस्थापनांमध्ये अ‍ॅटोमॅटिक हॅन्ड सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र ४ ते १० हजारापर्यंत मिळणाऱ्या या मशीन्स अतिशय महागड्या असून सामान्य माणसे किंवा ग्रामीण भागातील शासकीय शाळांमध्ये ते घेणे शक्य नाही. अशी परिस्थिती लक्षात घेत प्रा. मानकर यांनी केवळ १५० ते २०० रुपयात ही हॅन्ड सॅनिटायझर मशीन तयार केली आहे.त्यांनी सांगितले, लॉकडाऊनच्या काळात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आॅनलाईन धडे देण्याचे काम चालले आहे. यादरम्यान इलेक्ट्रॉनिक्सच्या विषयात मोटरबाबत शिकविताना या प्रकल्पाची कल्पना त्यांच्या मनात आली. त्यांनी आधी त्या प्रकल्पाची आकृती काढून विद्यार्थ्यांना समजावली. त्यांनी तेलाच्या पिंपाला एका भागाकडून कापले. बॅटरी व वायरचा वापर करून तयार केलेले सर्किट पिंपामागे जोडले. इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानातून १०-२० रुपयाला मिळणारे सेन्सर विकत आणून पिंपाला जोडले. बाहेर एक सॅनिटायझर भरलेल्या बॉटलमध्ये मोटर फिट केली आणि ती सर्किट व सेन्सरशी जोडली. निव्वळ या सेन्सरसमोर हात नेला तर अ‍ॅटोमॅटिक मशीनच्या कामाप्रमाणे सॅनिटायझर तुमच्या हातावर येते. विशेष म्हणजे याच तंत्राद्वारे सॅनिटायझरऐवजी पाण्याची बॉटल जोडून हात धुण्याची अ‍ॅटोमॅटिक मशीन म्हणूनही याचा उपयोग केला जाऊ शकत असल्याचे प्रा. मानकर यांनी सांगितले. खरेतर टाकाऊ वस्तूंच्या मदतीने अभ्यासक्रमातील वैज्ञानिक प्रयोगांचा आधार घेत दैनंदिन उपयोगात येतील असे महत्त्वपूर्ण उपकरण सहज बनविता येतात, हेच दाखविण्यासाठी हा प्रयोग केल्याची भावना प्रा. मानकर यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर