शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या ऑटोचालकास अटक

By दयानंद पाईकराव | Updated: February 24, 2024 21:25 IST

अक्षय विनोद भेसारे (२५, रा. गौतमनगर, बेझनबाग, ख्रिश्चन कॉलनी, जरीपटका) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी ऑटोचालकाचे नाव आहे. 

नागपूर : भेटीच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला आपल्या ऑटोत बसवून वाडी परिसरातील एका घरात नेऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीला सीताबर्डी पोलिसांनी अटक केली आहे. अक्षय विनोद भेसारे (२५, रा. गौतमनगर, बेझनबाग, ख्रिश्चन कॉलनी, जरीपटका) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी ऑटोचालकाचे नाव आहे. 

बेझनबागमध्ये राहणारी पीडित अल्पवयीन मुलगी एका रुग्णालयात नोकरी करते. ती ऑटोने रुग्णालयात ये-जा करीत होती. महिनाभरापूर्वी तिची आरोपी अक्षयशी ओळख झाली. त्याने अल्पवयीन मुलीला त्याचा नंबर दिला. कधीही आवश्यकता असल्यास फोन करण्यास सांगितले. त्यामुळे रात्री ती ऑटोसाठी अक्षयला फोन करीत होती. त्यातून त्यांची मैत्री झाली. त्याने अल्पवयीन मुलीला लवकरच त्याच्या लहान बहिणीचे लग्न होणार असल्याचे सांगितले. त्याने बहीण आणि कुटुंबीयांची तिच्याशी ओळख करून देण्याची इच्छा असल्याचे सांगितले. वारंवार आग्रह केल्याने अल्पवयीन मुलगी त्याच्या घरी जाण्यासाठी तयार झाली. 

१७ फेब्रुवारीला दुपारी १ वाजता अक्षयने इटरर्निटी मॉलजवळून तिला त्याच्या ऑटोत बसवले. तो तिला वाडी परिसरातील एका घरात घेऊन गेला. तेथे तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार देताच तिला धमकी देऊन त्याने जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच, याबाबत कोणालाही काही सांगितल्यास तिला जीवे मारण्याची धमकी दिली.

 अल्पवयीन मुलीने कुटुंबीयांना घटनेची माहिती दिल्यानंतर सीताबर्डी ठाण्यात अक्षय विरुद्ध कलम ३४२, ३६३, ३६६ (अ), ३७६, सहकलम ४, ८, १२ पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी आरोपी अक्षयला अटक करून त्याच्या ताब्यातून २ लाख रुपये किमतीचा ऑटो जप्त केला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसNagpur Aakashvaniनागपूर आकाशवाणी केंद्र