दिल धडकने का सबब.. याद आया; विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गझलांनी श्रोते मंत्रमुग्ध
By जितेंद्र ढवळे | Updated: January 24, 2024 16:14 IST2024-01-24T16:13:29+5:302024-01-24T16:14:32+5:30
शतस्पंदन पश्चिम क्षेत्रीय आंतरविद्यापीठ युवा महोत्सव.

दिल धडकने का सबब.. याद आया; विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गझलांनी श्रोते मंत्रमुग्ध
जितेंद्र ढवळे, नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ३७ वा पश्चिम क्षेत्रीय आंतरविद्यापीठ युवा महोत्सव सुरू आहे. युवा महोत्सवात विविध राज्यांतील विद्यापीठांमधून आलेले विद्यार्थी त्यांच्या कलागुणांची उधळण करताना दिसून येतात. गुरुनानक भवन येथे विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गझलांची मैफिल रंगली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाप्रकारास उपस्थितांनी देखील उत्स्फूर्तपणे साथ दिली.
नागपूर विद्यापीठाची तेजस्विनी सुनील खोडतकर हिने 'वही आज सितारे तराशते थे' ही गझल सादर करीत उपस्थितांची दाद मिळविली. त्याचप्रमाणे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या विद्यार्थ्याने 'दिल धडकने का सबब याद आया' वो तेरी याद थी अब याद आया, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांने 'दिल है दुखाने के लिए', संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्यार्थ्याने 'तेरी यादो की तनहाओ में', डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर येथील विद्यार्थिनीने 'मै खयाल हू किसी और, का सोचता कोई और है' अशा एकापेक्षा एक गझल सादर केल्या.
एकल शास्त्रीय संगीत प्रकारामध्ये भारतीय विद्यापीठ पुणे येथील भक्ती सुनील पवार, गुजरात तंत्रज्ञान विद्यापीठ आमदाबाद येथील मित्सु दिवेश भट्ट, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील गायत्री लक्ष्मण थिपे, विश्वकर्मा विद्यापीठ पुणे येथील अमन रायथाथा, ॲटलास स्कील तंत्रज्ञान विद्यापीठ मुंबई येथील अनू नवघरे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टीचर एज्युकेशन गांधीनगर येथील कंदर्प पवनकुमार शुक्ला, कर्मवीर भाऊराव पाटील सातारा येथील श्रुतिका श्रीहरी पुजारी, सुदर्शन मच्छिंद्रनाथ नलावडे, एसएनडीटी विद्यापीठ मुंबई येथील प्राजक्ता महादेव शेंद्रे, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे अभयसिंग चंद्रकांत वाघचौरे, महाराजा कृष्णकुमारसिंहजी भावनगर विद्यापीठ भावनगर येथील ईशा मनीषभाई दवे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील श्री अशोकसिंग भक्ती, हेमचंद्राचार्य नॉर्थ गुजरात विद्यापीठ पटन गुजरात येथील मयूर मुकेशभाई दवे, सरदार पटेल विद्यापीठ आनंद येथील सर्जन शांतीलाल बरिया, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची तेजस्विनी सुनील खोडतकर, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील कल्याणी बाबुराव गायकवाड, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर येथील निषाद प्रमोद व्यास, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील अभिरूप रमाकांत पैंजाने, निरमा विद्यापीठ अहमदाबाद येथील हर्द मेहता, वत्सल उपाध्याय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर येथील आरोही अमोल मंडलिक यांनी सादरीकरण केले.