शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
6
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
7
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
8
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
9
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
10
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
11
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
12
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
13
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
14
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
15
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
16
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
17
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
18
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
19
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
20
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका

नागपुरातील एम्प्रेस सिटीच्या ५७ निवासी फ्लॅटचा लिलाव करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2019 12:45 AM

महापालिकेच्या मालमत्ता विभागाने थकबाकी वसुलीसाठी मोहीम हाती घेतली आहे. रमन सायन्सजवळील मेसर्स के. एस. एल. अ‍ॅन्ड इंडस्ट्रीज लि. एम्प्रेस मॉल रोड येथील ५७ निवासी फ्लॅटचा २०१० पासून मालमत्ता कर थकीत आहे.

ठळक मुद्देमनपाने बजावली नोटीस : १७ लाखांचा मालमत्ता कर थकीत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या मालमत्ता विभागाने थकबाकी वसुलीसाठी मोहीम हाती घेतली आहे. रमन सायन्सजवळील मेसर्स के. एस. एल. अ‍ॅन्ड इंडस्ट्रीज लि. एम्प्रेस मॉल रोड येथील ५७ निवासी फ्लॅटचा २०१० पासून मालमत्ता कर थकीत आहे. धंतोली झोन कार्यालयाने वसुलीसाठी वॉरंट बजावल्यानंतरही १७ लाखांची थकबाकी न भरल्याने निवासी फ्लॅटधारकांना लिलावाची नोटीस बजावण्यात आली आहे. यामुळे फ्लॅटधारकांत खळबळ उडाली आहे.फ्लॅटधारकांनी मेसर्स के. एस. एल. अ‍ॅन्ड इंडस्ट्रीज लि. एम्प्रेस मॉल यांच्याकडून फ्लॅट खरेदी करताना ‘सेल अ‍ॅग्रीमेंट’ के ले आहे. त्यामुळे नगररचना विभागाला सर्व फ्लॅट एम्प्रेस मॉल व्यवस्थापनाच्या नावावर आहेत. फ्लॅटधारकांच्या नावावर अद्याप नोंद झालेली नाही. ५७ फ्लॅटकडे नऊ लाख रुपये मालमत्ता कर व थकीत रकमेवर लाख रुपये दंड आकारण्यात आला आहे. लिलावाची नोटीस बजावताच फ्लॅटधारकांनी दंड माफ करावा यासाठी महापालिका आयुक्तांकडे अर्ज केला आहे. थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी मालमत्ताधारकांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचा निर्णय मालमत्ता विभागाने घेतला आहे. त्यानुसार २ कोटी ३४ लाखांची थकबाकी असलेल्या ७३४ मालमत्ताधारकांना वॉरंट बजावण्यात आले होते. यातील ४१७ मालमत्ताधारकांनी ७४ लाख ७६ हजारांची थकबाकी जमा केली. त्यानंतरही थकबाकी न भरलेल्या ३२० मालमत्ताधारकांचा हुकूमनामा प्रसिद्ध करण्यात आला. यातील १२६ लोकांनी थकबाकी जमा केली. परंतु अजूनही १२६ लोकांनी थकबाकी जमा केलेली नाही. त्यांच्या मालमत्ता लिलावात काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मालमत्ताधारकांनी थकबाकी जमा करून कारवाई टाळावी, असे आवाहन मालमत्ता विभागाचे सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम यांनी केले आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाEmpress Mallएम्प्रेस मॉल