शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांनो लक्ष द्या; नागपूर रेल्वेस्थानक आज झाले शंभर वर्षाचे !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 11:01 IST

Nagpur : चारही दिशेने जातात रेल्वे मार्ग; देशातील एकमेव डायमंड क्रॉसिंग नागपुरात

नागपूर: देशाचा केंद्रबिंदू असलेल्या नागपुरातील रेल्वेस्थानकाला आज १५ जानेवारी रोजी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. गेल्या शतकातील आठवणींचा साक्षीदार असलेल्या या स्थानकाच्या इमारतीचे उद्घाटन १५ जानेवारी १९२५ रोजी सर फ्रैंक यांच्या हस्ते झाले होते. त्या दिवसापासून कोरोना काळातील प्रवासी वाहतुकीचा अपवाद वगळता रेल्वेची ये जा थांबली नाही. माल व प्रवासी वाहतुकीसह जाहिरातींमधूनही लक्षणीय उत्पन्न देणारे हे स्थानक नागपूरच्या विकासाचे केंद्रबिंदू ठरले आहे. वर्ल्ड क्लास स्टेशन या दर्जाकडे ड्रोप घेत असताना शंभराव्या वाढदिवसानिमित्त एखाद्या सोहळयाच्या आयोजनाचा विसर रेल्वे प्रशासनाला पडला आहे. त्यामुळे प्रवाशांनो, आपले स्थानक शंभर वर्षांचे झाले, याची दखल आज तुम्हीच घ्या. 

१ रुपयात जमीन, सावनेरचे दगड नागपूर रेल्वेस्थानकाच्या उभारणीसाठी १९२५ मध्ये खैरागडच्या राजाने ब्रिटिश सरकारला १ रुपयात ३० एकर जमीन विकली, तर या स्थानकाची इमारत सावनेरहून आणलेल्या वाळूच्या दगडापासून बनलेली आहे.

४८७ कोटींचा खर्च 'वर्ल्ड क्लास'साठीरेल लैंड डेव्हलपमेंट अॅथॉरिटी' (आरएलडीए) अंतर्गत नागपूर रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासाचे काम सुरू आहे. त्यासाठी ४८७.७७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे, 'वर्ल्ड क्लास' स्थानकासाठी हे काम येत्या डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे

कामांची प्रगती स्थानकाच्या उत्तरेकडील फूट ओव्हर ब्रिज (एफओबी), दक्षिणेकडील एफओबी आणि एअर कॉनकोर्स, हेरिटेज इमारतीचे काम सुरू आहे. त्यानंतर फलाट आणि छताचे नूतनीकरण सुरू होईल. स्थानकाच्या पश्चिमेला बहुस्तरीय रचना (G 2) सह निर्गमन आणि आगमन प्लाझा, तसेच या प्लाझामध्ये ३ हजार ४२० चौरस मीटरचे तळघर, पार्किंग क्षेत्र अशा अनेक सुविधा प्रस्तावित आहेत.

३०० गाड्या, दोन लाखांवर प्रवासी१९४० पर्यंत या रेल्वेस्थानकातून फक्त १० गाड्या जात होत्या. सध्या दररोज २४५ मेल/एक्सप्रेस आणि पॅसेंजर गाड्या वेगवेगळ्या दिशांनी धावतात. त्यामध्ये २२ गाड्या या स्थानकावरून निघतात व संपतात. आणि अंदाजे १ लाख ८५ हजार प्रवासी ये-जा करतात.

टॅग्स :nagpurनागपूर