नागपुरातील काँग्रेस नगरसेवकांचे पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 09:57 PM2018-01-29T21:57:10+5:302018-01-29T21:59:10+5:30

गेल्या काही महिन्यांपूर्वी महापालिकेतील गटनेते पदावरून काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाले. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी गटाचे तानाजी वनवे यांनी बहुमताच्या आधारे विरोधी पक्षनेतेपद बळकावले. वास्तविक काँग्रेसने गटनेते म्हणून संजय महाकाळकर यांची नियुक्ती केली होती. हा वाद अद्याप निवळलेला नाही. त्यातच शहर काँग्रेसतर्फे चतुर्वेदी यांना नोटीस बजावल्याने महापालिकेतील काँग्रेस पक्षात पुन्हा रस्सीखेच सुरू झाली आहे. नोटीससंदर्भात पक्षश्रेष्ठी कोणता निर्णय घेतात, याकडे नगरसेवकांचे लक्ष लागले आहे.

Attention of Congress corp-orators of Nagpur at decision of high command |  नागपुरातील काँग्रेस नगरसेवकांचे पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे लक्ष

 नागपुरातील काँग्रेस नगरसेवकांचे पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे लक्ष

Next
ठळक मुद्देसतीश चतुर्वेदींना नोटीस : मनपा काँग्रेसमधील हालचाली वाढल्या

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या काही महिन्यांपूर्वी महापालिकेतील गटनेते पदावरून काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाले. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी गटाचे तानाजी वनवे यांनी बहुमताच्या आधारे विरोधी पक्षनेतेपद बळकावले. वास्तविक काँग्रेसने गटनेते म्हणून संजय महाकाळकर यांची नियुक्ती केली होती. हा वाद अद्याप निवळलेला नाही. त्यातच शहर काँग्रेसतर्फे चतुर्वेदी यांना नोटीस बजावल्याने महापालिकेतील काँग्रेस पक्षात पुन्हा रस्सीखेच सुरू झाली आहे. नोटीससंदर्भात पक्षश्रेष्ठी कोणता निर्णय घेतात, याकडे नगरसेवकांचे लक्ष लागले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार चतुर्वेदी यांना नोटीस मिळताच महापालिकेतील दोन्ही गट सक्रिय झाले आहेत. चतुर्वेदी यांना शहर काँग्रेसने बजावलेली नोटीस अवैध असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे. चतुर्वेदी यांच्यावर पक्षाने कारवाई केल्यास आम्ही पदाचे राजीनामे देण्यास मागे-पुढे पाहणार नाही, अशी भूमिका काहींनी घेतली आहे. मात्र यात काँग्रेसच्या तीन ते चार नगरसेवकांचाच समावेश आहे. इतर नगरसेवक मात्र संघर्ष करण्याच्या विचारात आहेत.
दुसरीकडे चतुर्वेदी यांना नोटीस बजावल्याने शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या गटातील नगरसेवकांत उत्साहाचे वातावरण आहे. पक्षश्रेष्ठींनी चतुर्वेदी यांच्यावर कारवाई केल्यास हा गट महापालिकेतील गटनेता बदलण्यासाठी सक्रिय होण्याची शक्यता आहे. यामुळे चतुर्वेदी यांना नोटीस बजावल्याने महापालिकेतील काँग्रेस नगरसेवकांच्या हालचाली वाढल्या आहेत.
चतुर्वेदी यांना नोटीस बजावण्याचा अधिकार शहर काँग्रेसला नसल्याची भूमिका तानाजी वनवे यांनी घेतली आहे. ज्यांना काँग्रेसचा इतिहास व कायदा माहीत नाही, तेच असे कृ त्य करू शकतात. काँग्रेस ही कुठल्या एका व्यक्तीची मालमत्ता नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

Web Title: Attention of Congress corp-orators of Nagpur at decision of high command

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.