शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

युनियन बँकेतील रोकड लुटण्याचा प्रयत्न

By admin | Updated: May 16, 2015 02:43 IST

मुख्य दारासह आतमधील कुलूप तोडून चोरट्यांनी युनियन बॅकेतील कोट्यवधींची रोकड लुटण्याचे प्रयत्न केले.

चोरटे पोहचले स्ट्राँग रूममध्ये : कोट्यवधी बचावलेनागपूर : मुख्य दारासह आतमधील कुलूप तोडून चोरट्यांनी युनियन बॅकेतील कोट्यवधींची रोकड लुटण्याचे प्रयत्न केले. मात्र, बरेच परिश्रम करूनही ‘स्ट्राँग रूम‘ तोडण्यात यश न आल्यामुळे चोरट्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. युनियन बँकेच्या सिव्हील लाईन शाखेत घडलेल्या या प्रकारामुळे संबंधितांमध्ये खळबळ निर्माण झाली. सहायक व्यवस्थापक अमित रामराव देशमुख यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, गुरुवारी रात्री ८ .१५ ला ते बँकेचे मुख्य प्रवेशद्वार, चॅनल गेटला कुलूप लावून घरी गेले. शुक्रवारी सकाळी ६.४५ ला पोहचलेल्या कर्मचाऱ्याने दाराची कुलूपं तुटून असल्याची माहिती अधिकाऱ्यांना दिली. त्यानुसार बँकेचे वरिष्ठ अधिकारी शाखेत पोहचले. चोरट्यांनी स्ट्राँग रूमपर्यंत पोहचण्याची मजल मारली. त्यांनी स्ट्राँग रूममधील कोट्यवधींची रोकड काढण्याचे खूप प्रयत्न केले. मात्र, त्यांना यश आले नाही. त्यामुळे नाईलाजाने त्यांना हात हालवत परत जावे लागले. बँकेच्या अधिकाऱ्यांनी सीताबर्डी पोलिसांना माहिती कळवली. बँकेत चोरीचा प्रयत्न झाल्याचे कळताच सेकंड पीआय चव्हाण, पीएसआय पवार आपल्या ताफ्यासह शाखेत पोहचले. चौकशीनंतर त्यांनी सहायक व्यवस्थापक देशमुख यांच्या तक्रारीवरून चोरीचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)कोट्यवधींची देवाणघेवाण, सुरक्षा रामभरोसे !बँकेत रोज कोट्यवधींची देवाणघेवाण होत असताना सुरक्षा मात्र रामभरोसे असल्याचेच पोलिसांच्या पाहणीत स्पष्ट झाले आहे. बँकेत आठ सीसीटीव्ही आहेत. मात्र, त्यांची रेकॉर्डिंग दोन महिन्यांपासून बंद असल्यामुळे चोरटे किती होते, किती वाजता आत गेले आणि कधी बाहेर निघाले, त्याबाबत कसलीही माहिती कळू शकली नसल्याचे सीताबर्डी पोलिसांनी सांगितले. दुसरे म्हणजे, बँकेत चौकीदारही नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या अनुषंगाने सहायक व्यवस्थापक देशमुख यांच्याकडे लोकमत प्रतिनिधीने वारंवार संपर्क साधून माहिती घेण्याचे प्रयत्न केले. देशमुख यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.