अट्टल वाहन चाेरटे अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:07 IST2021-06-19T04:07:23+5:302021-06-19T04:07:23+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : दुचाकी वाहने चाेरून नेणाऱ्या दाेघांना कामठी (नवीन) पाेलिसांनी अटक करीत त्यांच्याकडून ४७ हजार रुपये ...

अट्टल वाहन चाेरटे अटकेत
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : दुचाकी वाहने चाेरून नेणाऱ्या दाेघांना कामठी (नवीन) पाेलिसांनी अटक करीत त्यांच्याकडून ४७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. दाेघेही अट्टल वाहन चाेर असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. ही कारवाई गुरुवारी (दि. १७) सायंकाळी कामठी शहरात करण्यात आली.
हर्षद ऊर्फ हर्षू ऊर्फ चिक्या नंदलाल टेंबरे (२०, रा. कुंभारे कॉलनी, नवीन कामठी) व अतुल देवेंद्र दुपारे (१९, रा. रामगड, कामठी) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. मोहम्मद फजल मोहम्मद अफजल (२२, रा. इस्माईलपुरा, कामठी) याने त्याच्या घरासमोर एमएच-४०/बीआर-००५० क्रमांकाची माेटरसायकल उभी ठेवली हाेती. ती चाेरट्याने चाेरून नेली. ही घटना गुरुवारी (दि. १०) घडली हाेती.
ही माेटरसायकल हर्षद व अतुल या दाेघांनी चाेरून नेल्याची माहिती मिळताच पाेलिसांनी दाेघांनाही गुरुवारी सायंकाळी ताब्यात घेत चाैकशी सुरू केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली देताच अटक केली आणि त्यांच्याकडून ४० हजार रुपये किमतीची माेटरसायकल आणि सात हजार रुपये राेख असा एकूण ४७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कामठी (नवीन) पाेलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक सुरेश कन्नाके, मंगेश लांजेवार, राजेंद्र टाकळीकर, सुधीर कनोजिया, संदीप गुप्ता, उपेंद्र यादव, सुरेश शेंडे यांच्या पथकाने केली.