हल्लेखोर पतीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:08 IST2021-07-01T04:08:14+5:302021-07-01T04:08:14+5:30

नागपूर : पत्नीवर जीवघेणा हल्ला करून तिच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या निखिल दमके यास गुन्हे शाखेच्या युनिट ४ ने अटक ...

The attacker's husband was arrested | हल्लेखोर पतीला अटक

हल्लेखोर पतीला अटक

नागपूर : पत्नीवर जीवघेणा हल्ला करून तिच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या निखिल दमके यास गुन्हे शाखेच्या युनिट ४ ने अटक केली आहे. निखिलने मंगळवारी पत्नी निर्मलावर चाकूने जीवघेणा हल्ला केला होता. त्याचा काही दिवसांपासून पत्नीसोबत वाद सुरू होता. या वादातून त्याने हल्ला केला. घटनेनंतर तो फरार होता. निरीक्षक शिवराम कुमरे, प्रदीप रायण्णावार, सहायक पोलीस निरीक्षक विजय कसोधन, अतुल इंगोले, रवींद्र पानबुडे, दीपक चोले, सतीश ठाकरे, विलास चिंचुरकर, नरेंद्र बांते, लीलाधर भेंडारकर यांनी मेडिकल चौकाजवळ त्यास अटक केली.

........

कळमना, जरीपटकातील गुंड तडीपार

नागपूर : झोन ५ च्या सहायक पोलीस आयुक्तांनी दोन गुंडांना जिल्ह्यातून तडीपार केले आहे. मिनिमातानगर, कळमनातील श्रावण उर्फ सावंत जोगणेला दोन वर्षे तर उन्नती कॉलनी जरीपटकाच्या रजत उर्फ प्रियांशु सहारेला वर्षभरासाठी तडीपार करण्यात आले आहे. दोघांविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांची शहरात दहशत आहे. श्रावणला पांढुर्णा छिंदवाडा तर प्रियांशुला देवलापारला सोडण्यात आले आहे.

........

Web Title: The attacker's husband was arrested