घरासमोर गाडी लावू दिली नाही म्हणून घरमालकावर हल्ला; गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2022 17:20 IST2022-04-19T17:01:06+5:302022-04-19T17:20:43+5:30
आरोपी गडपालेने लोखंडी रॉडने हल्ला चढवून वर्मा यांना जबर जखमी केले.

घरासमोर गाडी लावू दिली नाही म्हणून घरमालकावर हल्ला; गुन्हा दाखल
नागपूर : घरासमोर वाहन पार्किंग करण्यास मनाई केली म्हणून एका आरोपीने घरमालकावर हल्ला चढवला. यात राहुल तुळशीदास वर्मा (वय ३६) हे जबर जखमी झाले. सोमवार दुपारी मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
वैभवानंद सोसायटीत राहुल तुळशीदास वर्मा राहतात. त्याच भागात आरोपी संजय गणेश गडपाले (वय ४७) याचे घर आहे. सोमवारी सकाळी ११ ते ११.३० च्या सुमारास आरोपी गडपाले याने त्याचे वाहन वर्मा यांच्या घरासमोर लावण्याचा प्रयत्न केला. त्याला वर्मा यांनी विरोध केला. यामुळे दोघांमध्ये कडाक्याचा वाद झाला. त्यानंतर काही वेळाने आरोपी गडपालेने लोखंडी रॉडने हल्ला चढवून वर्मा यांना जबर जखमी केले.
याेळी शेजारची मंडळी धावली व त्यांनी आरोपीला आवरले. जखमी वर्मा यांनी उपचार करून घेतल्यानंतर मानकापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीची चौकशी सुरू आहे.