अतिक्रमणावरून गुन्हेगारावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:57 IST2021-02-05T04:57:05+5:302021-02-05T04:57:05+5:30
नागपूर : जागेच्या वादातून गुन्हेगार व त्याच्या पत्नीवर हल्ला करण्यात आला. काठीने मारहाण करून त्यांना जखमी करण्यात आले. ही ...

अतिक्रमणावरून गुन्हेगारावर हल्ला
नागपूर : जागेच्या वादातून गुन्हेगार व त्याच्या पत्नीवर हल्ला करण्यात आला. काठीने मारहाण करून त्यांना जखमी करण्यात आले. ही घटना गणेशपेठ पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या कांजी हाऊस येथे ही घटना घडली. पोलिसांनी आरोपी शेख शारीक शेख सलीम (२१ रा. कर्नलबाग, रामजीवाडी) आणि धीरज बाबूलाल यादव (२७, रा. संघर्षनगर) यांना अटक केली.
कांजी हाऊसजवळ राहणारा अनिल बैजू गौरचे घराजवळच किराणा दुकान आहे. पोलीस सूत्रांनुसार, गौर हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्या दुकानाच्या बाजूलाच आरोपी कबाडाचे दुकान लावतात. आरोपी गौरवर त्याच्या दुकानाचे सामान हटवण्यासाठी दबाव टाकत होते. अनिल आणि आरोपी दोघांनीही अतिक्रमण करून जागा बळकावली होती. त्यामुळे त्यांच्यात नेहमीच वाद होत होता. शनिवारी सकाळी ९ वाजता त्यांच्यात पुन्हा वाद झाला. आरोपींनी गौरवर काठीने हल्ला केला. त्याची पत्नी वाचवण्यासाठी आली असता, तिलाही जखमी करण्यात आले. गणेशपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपींना अटक केली.