जेएनयू हल्ला; विद्यार्थी संघटना व अभाविपची नागपूर विद्यापीठासमोर निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 11:06 IST2020-01-07T11:05:55+5:302020-01-07T11:06:39+5:30

नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रविवारी विद्यार्थी व शिक्षकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मंगळवारी सकाळी नागपूर विद्यापीठाच्या विद्यापीठ परिसरातील फाटकासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले.

Attack of the JNU; Demonstrations of student unions and Abvp before Nagpur University | जेएनयू हल्ला; विद्यार्थी संघटना व अभाविपची नागपूर विद्यापीठासमोर निदर्शने

जेएनयू हल्ला; विद्यार्थी संघटना व अभाविपची नागपूर विद्यापीठासमोर निदर्शने

ठळक मुद्देडाव्यांचा हात असल्याचे अभाविपचे म्हणणे

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रविवारी विद्यार्थी व शिक्षकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मंगळवारी सकाळी नागपूर विद्यापीठाच्या विद्यापीठ परिसरातील फाटकासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले. त्याचवेळी अभाविपच्या नागपूर शाखेतर्फे ही या हल्ल्यात डाव्या संघटनांचा हात असल्याचे सांगत निषेध करण्यात आला.
हा हल्ला अभापिचा नसून त्यात डाव्यांचा हात असल्याचा अभाविपचा दावा असून त्यासंदर्भात लवकरच आंदोलन करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या हल्ल्याचा देशाच्या सर्वच पातळ््यांवरून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Attack of the JNU; Demonstrations of student unions and Abvp before Nagpur University