तरुणीवर अत्याचार, आराेपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:13 IST2021-09-04T04:13:31+5:302021-09-04T04:13:31+5:30

सावनेर : तरुणीवर तीनदा बळजबरीने लैंगिक अत्याचार व विनयभंग केल्याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी दाेघांना अटक केली आहे. ही घटना सावनेर ...

Atrocities on young woman, RAP arrested | तरुणीवर अत्याचार, आराेपी अटकेत

तरुणीवर अत्याचार, आराेपी अटकेत

सावनेर : तरुणीवर तीनदा बळजबरीने लैंगिक अत्याचार व विनयभंग केल्याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी दाेघांना अटक केली आहे. ही घटना सावनेर शहरात नुकतीच घडली.

शुभम दाैलत नारेकर (२७) व निखिल नीळकंठ भगत (३६), दाेघेही रा. हाेळीचाैक, सावनेर, अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. १९ वर्षीय तरुणी सावनेर शहरातील झुम्बा क्लासला जायची. शुभमने तिच्याशी जवळीक साधून तिला २५ ऑक्टाेबर २०२० राेजी घरी बाेलावले व तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. याबाबत कुठेही वाच्यता न करण्याची धमकीही दिली. ताे तिला वारंवार फाेन करून धमकी व त्रास द्यायचा. त्याने २ ऑगस्ट २०२१ राेजी तिचा खापा राेडवर विनयभंगही केला. त्यानंतर निखिल भगत याने २१ ऑगस्ट २०२१ राेजी बळजबरीने अत्याचार केला. निखिल तिला वारंवार शिवीगाळ व धमकी देत असल्याने तिने हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला. कुटुंबीयांनी तिला विश्वासात घेत पाेलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी भादंवि ३७६, ३७६ (२) (एन), ३५४, ३५४ (ड) , ५०४, ५०७, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून दाेघांनाही अटक केली. या घटनेचा तपास सहायक पाेलीस निरीक्षक साेनाली रासकर करीत आहेत.

Web Title: Atrocities on young woman, RAP arrested