चिमुकलीवर अत्याचार

By Admin | Updated: September 8, 2015 05:02 IST2015-09-08T05:02:32+5:302015-09-08T05:02:32+5:30

एका नराधम तरुणाने पाच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केला. ही घटना लकडगंज पोलीस ठाणे हद्दीत घडली.

Atrocities on the Chimukulla | चिमुकलीवर अत्याचार

चिमुकलीवर अत्याचार

नागपूर : एका नराधम तरुणाने पाच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केला. ही घटना लकडगंज पोलीस ठाणे हद्दीत घडली.
राहुल रमेश राऊत (२०) असे आरोपीचे नाव आहे. पीडित चिमुकलीच्या आईचा मानलेला भाऊ लकडगंज परिसरात राहतो. त्याच्याकडे रविवारी गोकुळाष्टमीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त मुलगी आपल्या आईसोबत आली होती. रात्री सुमारे १०.३० वाजताच्या दरम्यान मुलीची आई व इतर नातेवाईक जेवण करीत होते. तेव्हा मुलगी कुठे दिसली नाही. त्यामुळे आईने आवाज दिला तेव्हा ती गच्चीवरून उतरताना दिसली. रात्रीच्या वेळी गच्चीवर कशाला गेली म्हणून विचारले असता मुलीने घडलेला प्रसंग सांगितला.
आरोपी राहुल चिमुकलीला घेऊन गच्चीवर गेला होता. त्याने चिमुकलीसोबत बळजबरी केली. दरम्यान आरोपी फरार झाला. त्याला सोमवारी अटक करण्यात आली. आरोपी हा पीडित मुलीच्या आईच्या मानलेल्या भावाच्या घरी भाड्याने राहतो.
त्याच्याविरुद्ध बलात्कार व बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Atrocities on the Chimukulla