शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

राजकीय अस्थिरतेमुळे कर्मचारी वर्गात चिंतेचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 11:09 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर सरकार स्थापन होत नसल्यामुळे शासनातील अधिकारी व कर्मचारी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. मागील अनेक महिन्यांपासून महत्त्वाचे सेवाविषयक प्रश्न प्रलंबित असून त्यावर निर्णय झाले नाही.

ठळक मुद्देअनेक सेवाविषयक प्रश्न प्रलंबित : राजकीय पेच सुटण्याच्या प्रतीक्षेत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर सरकार स्थापन होत नसल्यामुळे शासनातील अधिकारी व कर्मचारी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. मागील अनेक महिन्यांपासून महत्त्वाचे सेवाविषयक प्रश्न प्रलंबित असून त्यावर निर्णय झाले नाही. राज्यात आलेली ही राजकीय अस्थिरता लवकरच संपुष्टात येईल याची प्रतीक्षा कर्मचारी करीत आहे.राज्यात सरकार कुणाचे येणार यावरून दररोज खलबते सुरू आहे. राज्याच्या राजकारणात घडामोडी इतक्या झपाट्याने बदलत आहे की, कोण मुख्यमंत्री होईल याबाबत साशंकताच आहे. एकीकडे भाजपाने सरकार स्थापन करणार नाही, असे राज्यपालांना कळ्विले आहे. त्यामुळे शिवसेना अभद्र युती करणार याकडे वाटचाल सुरू आहे. अभद्र युतीच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणारे खासदार संजय राऊत यांना सोमवारी अचानक हृदयाघात झाल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यामुळे परत अभद्र युतीला ब्रेक लागेल, असेही वाटायला लागले आहे. राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आलेल्या भाजपाला साथ देण्यास शिवसेना तयार नाही. त्यामुळे सरकार स्थापनेवरून पेच चांगलाच वाढला आहे. जितक्या लवकर हा पेच सुटेल, तितक्या लवकर शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे.शासकीय कर्मचाऱ्यांचे जे महत्त्वाचे सेवाविषयक प्रश्न प्रलंबित आहेत त्यामध्ये के. पी. बक्षी समितीने सातव्या वेतन आयोगानुसार वेतन त्रुटीचा खंड २ अहवाल हा २८ आॅगस्ट रोजी सादर केला त्यावर मंत्रिमंडळात निर्णय होणे आवश्यक आहे. सातव्या वेतन अयोगाच्या शिफारशीनुसार केंद्राप्रमाणे भत्ते मिळणे, प्रत्येक विभागाचा आकृतिबंध ठरविणे, रिक्त पदे भरणे, पदोन्नतीमध्ये आरक्षणचा प्रश्न निकाली काढणे, विविध योजनेसाठी अनुदान, याशिवाय सेवानिवृत्तीचे वय ६० करणे, पाच दिवसांचा आठवडा करणे, बाल संगोपन रजा दोन वर्षे करणे, १ जानेवारी व १ जुलै २०१९ पासून महागाईभत्ता वाढ आदी प्रश्नावर निर्णय प्रलंबित आहेत.निर्णय प्रक्रिया रेंगाळल्यालोकप्रतिनिधी व प्रशासन ही लोकशाहीच्या रथाची दोन चाके असून दोन्ही व्यवस्था एकमेकांस पूरक आहेत. सरकार अथवा लोकप्रतिनिधीने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणे हे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कर्तव्य आहे. त्याचबरोबर सरकारकडून सेवाविषयक प्रश्नावर निर्णय घेऊन ते सोडविण्याची कर्मचाऱ्यांची अपेक्षा असते. आधी विधानसभा निवडणूक आचारसंहिता व आता राजकीय अस्थिरतेमुळे राज्यात सरकार ही व्यवस्था अस्तित्वात नाही, त्यामुळे निर्णय प्रक्रिया स्थगित आहे. सरकार स्थापनेचा निर्णय लवकरात लवकर व्हावा, अशी शासकीय कर्मचाºयांना अपेक्षा असल्याचे मत कास्ट्राईब जि.प. कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सोहन चवरे यांनी व्यक्त केले

टॅग्स :Employeeकर्मचारीGovernmentसरकारPoliticsराजकारण