उपराजधानीत अस्थमाच्या रुग्णांत २५ टक्क्यांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 22:40 IST2017-11-23T22:36:58+5:302017-11-23T22:40:21+5:30

शहरात मेट्रो व रस्त्यांच्या कामांसह इतर बांधकामामुळे सतत उडणारी धूळ, जळणारा कचरा व थंडीत झालेली वाढ अस्थमा वाढण्यास कारणीभूत ठरले आहे. गेल्या १०-१५ दिवसांत अस्थामाच्या रुग्णांत २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

Asthma sufferers increased by 25% in Nagpur | उपराजधानीत अस्थमाच्या रुग्णांत २५ टक्क्यांनी वाढ

उपराजधानीत अस्थमाच्या रुग्णांत २५ टक्क्यांनी वाढ

ठळक मुद्देथंडी, प्रदूषण ठरत आहे कारण खासगीसह मेयो, मेडिकलमध्ये वाढले रुग्ण

ऑनलाईन लोकमत 
नागपूर : शहरात मेट्रो व रस्त्यांच्या कामांसह इतर बांधकामामुळे सतत उडणारी धूळ, जळणारा कचरा व थंडीत झालेली वाढ अस्थमा वाढण्यास कारणीभूत ठरले आहे. गेल्या १०-१५ दिवसांत अस्थामाच्या रुग्णांत २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. यात शहरीसोबतच ग्रामीण भागातील रुग्णांचाही समावेश आहे. केवळ मेयो, मेडिकलच नाही तर खासगी इस्पितळांमध्येही रुग्ण दिसून येत आहे.
धुळीचे कण, धूर, थंड हवामान, धूम्रपान अशा विविध बाबींमुळे अलीकडे अस्थमा रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. सिमेंटचे जंगल म्हणून ओळख निर्माण होऊ घातलेल्या नागपुरात प्रदूषणाची कमी नाही. सध्या धडाक्यात सुरू असलेले मेट्रो रेल्वे व सिमेंट रस्त्यांच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. थंडीमुळे ही धूळ खालीच राहत असल्याने याचा त्रास वाढल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. दुसरीकडे उब येण्यासाठी मोठ्या प्रमाणात कचरा जाळला जात आहे. अनेक लोक सर्रास टायर, प्लास्टिक जाळतात. यामुळे प्रदूषणात वाढ झाली आहे. यात थंडी वाढल्याने नागपुरात अस्थमा रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. यात लहान मुलांसोबतच वयोवृद्धांची संख्या जास्त असल्याची माहिती वरिष्ठ पल्मोनोलॉजिस्ट डॉ. अशोक अरबट यांनी दिली. ते म्हणाले, ज्या लोकांना अस्थमा (दमा) असतो त्यांची श्वसननलिका ही सामान्यांच्या तुलनेत जास्त संवेदनशील, प्रभावित होणारी आणि नाजुक असते. यामुळे धूळ, धूराच्या संपर्कात येताच ती आंकुचन पावून श्वसननलिकेवर सूज येते. कफ बाहेर पडतो. परिणामी रुग्णाला धाप लागते, खोकला येतो, छातीतून घरघर आवाज येते. एकूणच श्वसनप्रक्रिया सामान्य राहत नाही यालाच अस्थमा (दमा) म्हणतात. ही लक्षणे दिसणाºयांनी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. सध्या रुग्णालयात १०० रुग्णांमधून २०-२५ रुग्ण अस्थमाचे येत आहेत, असेही ते म्हणाले.
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) क्षय व उररोग विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. ज्ञानशंकर मिश्रा म्हणाले, या महिन्यात बाह्यरुग्ण विभागात अस्थामाच्या रुग्णांत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यातील अनेक रुग्णांशी चर्चा केल्यावर त्यांनी घराच्या बाजूला सुरू असलेले बांधकाम व त्यातून निघणारी सततची धूळ, जळणारा कचरा हे कारण सांगितले आहे.

Web Title: Asthma sufferers increased by 25% in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.