नागपुरात लाचखोर सहायक वनसंरक्षकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 11:45 PM2018-02-14T23:45:07+5:302018-02-14T23:51:18+5:30

तोडलेल्या लाकडांची वाहतूक करण्यासाठी वाहतूक परवाना मागणाऱ्यास ५५०० रुपयाची लाच मागणाऱ्या सहायक वनसंरक्षक व एका खासगी व्यक्तीला अटक करण्यात आली.

Assistant forest consevater arrested in Nagpur while taking bribe | नागपुरात लाचखोर सहायक वनसंरक्षकास अटक

नागपुरात लाचखोर सहायक वनसंरक्षकास अटक

Next
ठळक मुद्देएसीबीची कारवाई : दलालही सापडला

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तोडलेल्या लाकडांची वाहतूक करण्यासाठी वाहतूक परवाना मागणाऱ्यास ५५०० रुपयाची लाच मागणाऱ्या सहायक वनसंरक्षक व एका खासगी व्यक्तीला अटक करण्यात आली.
विनायक शामराव उमाळे (५७) असे आरोपीचे नाव आहे. तो सहायक वनसंरक्षक,कार्यालय (तेंदू कॅम्प) उपवनसंरक्षक वनविभाग नागपूर येथे कार्यरत आहे. तर रामभाऊ दामोदर प्रायकर (६५) रा. खापा ता. सावनेर असे खासगी इसमाचे नाव आहे. तो दलाल असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
तक्रारदार हे शेतकऱ्यांच्या शेतातील झाडे खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी मौजा सोनपूर ता. सावनेर येथील शेतकऱ्यांच्या  शेतातील झाडे खरेदी केली होती. तोडणी केलेल्या झाडांची वाहतूक करण्याकरिता वनविभागाकडून वाहतूक परवाना मिळण्याकरिता त्यांनी रीतसर अर्ज सादर केला होता. याबाबत ते उमाळे यांना भेटले होते. तेव्हा उमाळे यांनी प्रायकरला भेटण्यास सांगितले. प्रायकरने ५५०० रुपयाची लाच मागितली. तक्रारकर्त्याने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली.
बुधवारी लाचलुचपत विभागाने सापळा रचून दोघांना अटक केली. सावनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

Web Title: Assistant forest consevater arrested in Nagpur while taking bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.