दहावीतील विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:08 IST2021-06-24T04:08:28+5:302021-06-24T04:08:28+5:30
नागपूर : राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीचा निकाल ऑगस्टमध्येच घोषित होतील असे दिसत आहे. बोर्डाने विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाची प्रक्रिया २३ ...

दहावीतील विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाचे काम सुरू
नागपूर : राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीचा निकाल ऑगस्टमध्येच घोषित होतील असे दिसत आहे. बोर्डाने विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाची प्रक्रिया २३ जूनपासून सुरू केली. प्रत्यक्षात मूल्यांकनाचे सर्व काम २ जुलैपर्यंत संपविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र आता एवढ्या कमी वेळात हे काम पूर्ण होण्याबद्दल शंका आहे.
दरम्यान, बोर्डाने मूल्यांकनाच्या कामाची जबाबदारी शाळांना दिली आहे. सर्व शाळांनी मूल्यांकन करून याची माहिती बोर्डाच्या वेबसाईटवर ऑनलाईन द्यायची आहे. प्रत्यक्षात अनेक शाळांकडे संगणकच नाहीत. संगणक असेल तर ते चालविण्यासाठी प्रशिक्षित व्यक्ती नाही. जिल्हा परिषद आणि ग्रामीण क्षेत्रांमधील अनुदानित शाळांमध्ये या दोन्ही गोष्टींचा अभाव आहे. गैरअनुदानित खाजगी हिंदी व मराठी माध्यमांच्या शाळांमधील शिक्षकांना कोरोना संक्रमणामुळे सुट्यांवर पाठविण्यात आले आहे.
शाळांनी पाठविलेली माहिती एकत्रित करून ठरविलेल्या फाॅर्म्युल्यानुसार बोर्डाकडून गुणपत्रिका तयार केली जाणार आहे. सोबतच, विद्यार्थ्यांचे रेकॉर्डही तयार केले जाईल. सर्वात अधिक वेळ याच प्रक्रियेसाठी लागणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यामुळे जुलै महिन्यात निकाल लागण्याची शक्यता कमी दिसत आहे.