शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारचे नाव गुन्ह्यात का नाही? अजित पवार यांच्या मुलाला पोलिस वाचवत आहेत का? मुंढवा जमीन घोटाळाप्रकरणी उच्च न्यायालयाचा सवाल
2
लाडक्या बहिणींना ‘योग्यवेळी’ २१०० रुपये; विरोधकांकडून अदिती तटकरे यांची कोंडी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी किल्ला लढविला
3
इंडिगोवर नजर ठेवणार डीजीसीएची टीम; सीईओ पीटर एल्बर्सना हजर राहण्याचे आदेश
4
महाराष्ट्र ‘गप’गार; पारा १० अंशांपर्यंत घसरला; कडाक्याची थंडी पडली
5
जमिनीच्या ‘सनद’ची अट रद्द; महसूलमंत्री बावनकुळे यांनी विधानसभेत मांडले विधेयक
6
गोव्याच्या धर्तीवर वाहतूक पोलिसांकडे ‘बॉडी कॅमेरा’; मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट : प्रमुख शहरांत टप्प्याटप्प्याने
7
सदस्य आहेत तर मंत्री नाहीत अन् मंत्री आहेत तर लेखी उत्तरच मिळत नाही!
8
खडसेंना काेर्टाचा दणका, भाेसरी भूखंड घाेटाळाप्रकरणी आरोपमुक्तीचा अर्ज फेटाळला
9
भाजप, शिंदेसेनेत प्रवेश केलेल्यांची धाकधूक वाढली; दोन किंवा जास्त तिकीटे हवे असलेले हवालदिल
10
ई-वाहनांना येत्या ८ दिवसांत टोलमाफी, भरलेला मिळणार; राहुल नार्वेकर यांनी दिले आदेश
11
वर्षभरात आठ हजार नवीन एसटी बसेस रस्त्यावर येणार; २०२९ पर्यंत बस डेपोंचा कायापालट करणार
12
दीपावली उत्सव युनेस्कोच्या वारसा यादीत; भारतासाठी अभिमानाची घटना; पंतप्रधान मोदींनी केले निर्णयाचे स्वागत
13
मुंबईत आतापर्यंत सापडले ४१,०५७ दुबार मतदार, दुबार नावांमध्ये होणार; १५ ते २० टक्केपर्यंत घट !
14
काय झालास तू? 'व्होट बँके'साठी महाभियोग प्रस्ताव आणल्याचा आरोप, ठाकरेंना अमित शाहांनी घेरले
15
नेहरू, इंदिरा गांधी अन् सोनिया गांधी...! अमित शाह यांनी थेट लोकसभेत दिली मत चोरीची 3 उदाहरणं, स्पष्टच बोलले
16
"त्यांच्यावर बोलायला मी रिकामा नाही"; राहुल गांधींच्या आरोपांची मुख्यमंत्री फडणवीसांनी उडवली खिल्ली
17
सीतामढी जिल्ह्यात 'HIV ब्लास्ट', आतापर्यंत 7400 HIV ग्रस्त आढळले? डॉक्टर म्हणाले, बाधितांनी निगेटिव्हसोबत लग्न करू नये
18
इस्रायली पंतप्रधानांचा PM मोदींना फोन, या संदर्भात व्यक्त केला आनंद; गाझावरही चर्चा
19
भरधाव ब्रेझा उभ्या असलेल्या वॅगनआरला धडकली, दोन्ही कारने घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू
20
संस्थेची गाडी, हातात अर्ज अन् चर्चांना उधाण; तानाजी सावंतांच्या मुलाने भरला भाजपचा उमेदवारी अर्ज?
Daily Top 2Weekly Top 5

बूथवर कमी पडल्यानेच विधानसभेत धक्का :  भाजपचे संघटनात्मक मंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 22:32 IST

सत्तास्थापनेची कोंडी अद्यापही फुटली नसताना भारतीय जनता पक्षातर्फे नागपुरात गुरुवारी शहर संघटनात्मक विषयांवर मंथन करण्यात आले.

ठळक मुद्दे१० डिसेंबरपर्यंत शहराध्यक्ष निवड

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : सत्तास्थापनेची कोंडी अद्यापही फुटली नसताना भारतीय जनता पक्षातर्फे नागपुरात गुरुवारी शहर संघटनात्मक विषयांवर मंथन करण्यात आले. ‘बूथ’पातळीवर कमी पडल्याने विधानसभा निवडणुकांत धक्का बसला. त्यामुळे ‘बूथ’वर कार्यकर्त्यांनी जास्त जोर देऊन संघटन मजबुतीवर भर दिला पाहिजे, अशा स्पष्ट सूचनाच कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर शहर भाजपची संघटनात्मक पातळीवरची ही पहिलीच बैठक होती.गुरुवारी कविवर्य सुरेश भट सभागृहात नागपूर शहर भाजपाची संघटनात्मक बाबींवर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. शुक्रवारपासून बूथ समितीच्या निवडणुका सुरू होणार आहेत. त्यादृष्टीने या बैठकीत कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या. ‘बूथ’ मजबूत असेल तर निवडणुकांत पक्षाला यश मिळेल या उद्देशातून बूथप्रमुख मोहीम राबविण्यात आली होती. परंतु विधानसभेत ‘बूथ’ रचना असूनदेखील अपेक्षित यश मिळाले नाही. पक्षाला ‘बूथ’पातळीवर सक्षम व प्रत्यक्ष काम करणारे कार्यकर्ते हवे आहेत. त्यामुळे मंडळाच्या नवीन कार्यसमितीमध्ये अशाच लोकांना स्थान मिळेल, असेदेखील यावेळी स्पष्ट करण्यात आले. नागपुरात ‘बूथ’पातळीवरील निवडणुकांना शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे.संघटन पर्वांतर्गत होणाऱ्या संघटनात्मक निवडणुकांबाबत यात पदाधिकारी व कार्यकर्त्याना मार्गदर्शन करण्यात आले. भाजपमध्ये दर तीन वर्षांनी संघटनात्मक निवडणुका होतात. संघटन पर्वांमध्ये जिल्ह्यांमध्ये कार्यकर्ता मेळावे सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रभर सर्व जिल्ह्यांच्या बैठका झाल्या. त्यानंतर जिल्ह्याचे निवडणूक अधिकारी निश्चित झाले. जिल्ह्यामध्ये सक्रिय सदस्यांची तपासणी अधिकारी निश्चित झाले आहेत. या बैठकीला शहराध्यक्ष प्रवीण दटके, प्रदेश सह निवडणूक प्रमुख आ.अनिल सोले, आ.गिरीश व्यास, आ.कृष्णा खोपडे, आ.विकास कुंभारे, आ.मोहन मते, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विदर्भ प्रांत संघटनमंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर, अशोक मेंढे, संजय भेंडे, महामंत्री संदीप जाधव, सुभाष पारधी, कल्पना पांडे, श्रीकांत देशपांडे, गिरीश देशमुख, अर्चना डेहनकर, मंडळ अध्यक्ष रमेश भंडारी, दिलीप गौर, महेंद्र राऊत, बंडू राऊत, संजय ठाकरे, किशन गावंडे प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपा