शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

‘एस्मा’नतंरही नागपुरातील मनपाची शहर बस वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 1:13 AM

राज्य शासनाने महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम २०११ (एस्मा) च्या तरतुदीनुसार मंगळवारी आपली बस कर्मचाऱ्यांच्या संपावर बंदी घातली. त्यानतंर शिवसेनाप्रणीत भारतीय कामगार सेनेने संप अखेर मागे घेण्यात आल्याची घोषणा के ली होती. सकाळी १० पर्यंत बस वाहतूक बंदच होती. त्यानंतर काही बसेस सुरू झाल्या. दुपारी ३ वाजेपर्यंत शहरातील रस्त्यांवर जेमतेम ५० बसेस सुरू होत्या. ३२५ बसेस डेपोतच उभ्या असल्याने शहर बससेवा ठप्पच होती. यामुळे विद्यार्थी व प्रवाशांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागला. एस्मानंतरही कामावर रुजू न झाल्याने महापालिकेच्या परिवहन विभागाने १८ चालक व वाहकांना सेवेतून बडतर्फ केले आहे.

ठळक मुद्देविद्यार्थी व प्रवाशांचे हाल : १८ आंदोलक कर्मचारी बडतर्फ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर - राज्य शासनाने महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम २०११ (एस्मा) च्या तरतुदीनुसार मंगळवारी आपली बस कर्मचाऱ्यांच्या संपावर बंदी घातली. त्यानतंर शिवसेनाप्रणीत भारतीय कामगार सेनेने संप अखेर मागे घेण्यात आल्याची घोषणा के ली होती. सकाळी १० पर्यंत बस वाहतूक बंदच होती. त्यानंतर काही बसेस सुरू झाल्या. दुपारी ३ वाजेपर्यंत शहरातील रस्त्यांवर जेमतेम ५० बसेस सुरू होत्या. ३२५ बसेस डेपोतच उभ्या असल्याने शहर बससेवा ठप्पच होती. यामुळे विद्यार्थी व प्रवाशांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागला. एस्मानंतरही कामावर रुजू न झाल्याने महापालिकेच्या परिवहन विभागाने १८ चालक व वाहकांना सेवेतून बडतर्फ केले आहे.बुधवारी १२ वीच्या परीक्षा सुरू झाल्या. परंतु शहर बसेस बंद असल्याने परीक्षा केंद्रावर पोहचण्यासाठी विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला. वास्तविक शासनाने एस्मा लागू केल्यानंतर बुधवारी शहर बससेवा सुरळीत सुरू होईल, अशी अपेक्षा होती. परंतु सकाळी १० पर्यंत बस वाहतूक ठप्पच होती. विद्यार्थ्यांना सुविधा व्हावी यासाठी १० च्या सुमारास काही बसेस विनाकंडक्टर सोडण्यात आल्या. यात प्रामुख्याने मोरभवन, हिंगणा, बुटीबोरी, कळमेश्वर आदी भागातील फेºयांचा समावेश होता. यासाठी खासगी बस चालकांची मदत घेण्यात आली. दुपारी ३ नंतर शहरातील रस्त्यांवर १०० बसेस सुरू झाल्याचा दावा परिवहन विभागाने केला आहे. म्हणजे सायंकाळीसुद्धा ३७५ पैकी जेमतेम १०० बसेस रस्त्यांवर उतरल्या होत्या. यामुळे प्रवाशांना आॅटो वा टॅक्सीने प्रवास करावा लागला. शहर बस संपामुळे आॅटोचालकांची चांगली क माई झाली.किमान वेतनाच्या मागणीसाठी मंगळवारी शहर बस कर्मचाºयांनी संप पुकारल्याने शहरातील रस्त्यावर एकही बस धावली नव्हती. एस्मामुळे कामगार संघटनेने संप मागे घेण्याची घोषणा केली. परंतु याचा परिणाम दिसला नाही. परिवहन व्यवस्थान व कामगार संघटनांचे पदाधिकारी यांच्यात समन्वय नसल्याने सायंकाळपर्यंत संपाचा घोळ सुरू होता. याचा नागरिकांना हकनाक फटका बसला.कर्मचाऱ्यांचा नव्हे शिवसेनेचा बंदराज्य शासनाने एस्मा लागू केल्यानंतर शहर बस कर्मचारी कामावर परततील, अशी अपेक्षा होती. संप मागे घ्यावा, यासाठी आयुक्तांनी तीनवेळा कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनीही फोनवरून चर्चा केली. शिवसेनेच्या तथाकथित नेत्यांनी चिथावणी दिल्याने कर्मचारी कामावर परतले नाही. हा बंद कर्मचाऱ्यांचा नव्हे तर शिवसेनेच्या तथाकथित नेत्यांचा असल्याचा आरोप परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांनी केला आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा विचारात घेता, सकाळी बसेस सुरळीत सुरू व्हाव्यात यासाठी पोलीस आयुक्तांसह विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. परंतु पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली.                       संपकर्त्यांवर णतीही कारवाई केली नाही. सकाळी काही बसेस सोडण्यात आल्या. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर मोफत सोडण्यात आले. परंतु हिंगणा मार्गावर संपक र्त्यांनी बस अडवून दगडफेक केली. चालकाला धमकी दिली. यामुळे काही बसेस परत आल्या. यासंदर्भात एमआयडीसी पोलिसात तक्रार नोंदविण्यात आल्याची माहिती बंटी कुकडे यांनी दिली. सकाळी ९.३० पासून विविध मार्गावर ५० बसेस सोडण्यात आल्या. सायंकाळी १०० बसेस सुरू करण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले.न्यायालयीन लढाई लढणारमंगळवारी महापालिकेची सभा संपल्यानंतर पदाधिकारी व अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत चर्चेसाठी येतील, अशी अपेक्षा होती. परंतु तोडगा न काढता एस्मा लावण्यात आला. ही लोकशाहीची हत्या आहे. बारावीची परीक्षा सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून हा संप मागे घेण्यात येत आहे. असे असले तरी कर्मचाऱ्यांवर जो महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम (एस्मा) लावण्यात आला त्या विरोधात न्यायालयात लढाई लढणार असल्याचे या संघटनेचे नेते व माजी नगरसेवक बंडू तळवेकर व संघटनेचे सचिव अंबादास शेंडे यांनी सांगितले.असे आहेत बडतर्फ कर्मचारीसंपात सहभागी झाल्यामुळे अंबादास शेंडे, भाऊराव रेवतकर, राज सरोदे, विशाल राऊत, यशवंत शिंदे, पंडित राठोड, नरेंद्र कुईरे, अश्विन वाघमारे, प्रदीप चकोले, वसंत खडसे, राजेश गुप्ता, विशाल राऊत, शरद कलेश्वर, प्रशांत कडबे, रितेश चावरे, पवन क्षत्रे, भूमेश वाघमारे, क्रांती काळे, चेकर मनोज करोकर आदींना नोकरीतून बडतर्फ करण्यात आले आहे.प्रशासनाला अपयशआजवर चारवेळा बस कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. संपामुळे वेळोवेळी प्रवाशांची गैरसोय होते. याचा विचार करता पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याचे परिवहन विभागाला निर्देश दिले होते. परंतु कोणतीही पर्यायी व्यवस्था निर्माण केलेली नाही. हे विभागाचे अपयश आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री, महापौर, सत्तापक्षनेते व आयुक्त यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती बंटी कुकडे यांनी पत्रकारांना दिली.मनपाला ३५ लाखांचा फटकागेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या शहर बस कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महापालिकेला ३५ लाखांचा फटका बसला आहे. बुधवारी सकाळी नवीन ६० चालकांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर दुपारपासून १४५ बसेसची वाहतूक सुरू झाली. यात आर.के.आॅपरेटरच्या ४४, हंसाच्या ६६ व ट्रॅव्हल टाईमच्या ३५ बसेसचा समावेश आहे. सर्व प्र्रवाशांची मोफत वाहतूक करण्यात आली. एस्मा अंतर्गत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. हिंगणा नाक्यावर बस क्रमांक एमएच ६०६५ ची तोडफोड करण्यात आल्याची माहिती परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी दिली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBus Driverबसचालक