अश्विन मुद्गल नागपूरचे नवे जिल्हाधिकारी; प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 16:16 IST2018-04-16T16:16:05+5:302018-04-16T16:16:14+5:30

राज्य शासनाने सोमवारी राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी जारी केली. यानुसार नागपुरच्या जिल्हाधिकारीपदी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त अश्विन मुद्गल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Ashvin Mudgal is the new Collector of Nagpur; Administrative Officials Transfers | अश्विन मुद्गल नागपूरचे नवे जिल्हाधिकारी; प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या

अश्विन मुद्गल नागपूरचे नवे जिल्हाधिकारी; प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या

ठळक मुद्देमाधवी खोडे महिला व बालकल्याण विभागाच्या आयुक्त

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य शासनाने सोमवारी राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी जारी केली. यानुसार नागपुरच्या जिल्हाधिकारीपदी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त अश्विन मुद्गल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सद्यस्थितीत जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्याकडे हा पदभार होता.
अश्विन मुद्गल यांची जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाल्याचे पत्र अपर मुख्य सचिव मुकेश खुल्लर यांनी जारी केले आहे. सध्याचा कारभार नगरविकास विभागाचे प्रधान सचिवांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्यांकडे सोपविण्याची सूचना मुद्गल यांना देण्यात आली आहे. दरम्यान, ‘मायनिंग’चे महाव्यवस्थापक निरुपमा डांगे यांची बुलडाण्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. तर त्यांच्या जागी ‘मायनिंग’चे महाव्यवस्थापक म्हणून अकोल्याचे ‘सीईओ’ एस.राममूर्ती यांची बदली झाली आहे. अतिरिक्त विभागाच्या आदिवासी आयुक्त माधवी खोडे-चवरे यांची महिला व बालकल्याण विभागाच्या आयुक्तपदी बदली झाली आहे. तर त्यांच्या जागी एच.मोडक यांची अतिरिक्त आदिवासी आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title: Ashvin Mudgal is the new Collector of Nagpur; Administrative Officials Transfers