Ashok Saraf was also hit by pits on the roads | रस्त्यांवरील खड्ड्यांवर अशोक सराफ यांचाही प्रहार

रस्त्यांवरील खड्ड्यांवर अशोक सराफ यांचाही प्रहार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नाटकाच्या निमित्ताने नागपुरात आलेल्या ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी इतर अभिनेत्यांच्या शब्दावर शब्द ठेवत राज्यभरात रस्त्यांवर निर्माण झालेल्या खड्ड्यांवर प्रहार करत, आपली उद्विग्नता प्रसारमाध्यमांजवळ व्यक्त केली.


प्रशांत दामले, सुबोध भावे, पुष्कर श्रोत्री यांच्यापाठोपाठ अशोक सराफ यांनीही रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे. कलावंत आणि नागरिक सरकारला आरसा दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, ही नाराजी सरकारपर्यंत पोहोचतच नसेल तर त्याला काय अर्थ आहे, असे ते म्हणाले. कुणीतरी हा प्रयत्न करीत आहे. त्यावर उपाय करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने पुढाकार घेणे अपेक्षित आहे. अशा उपक्रमांमध्ये नागरिकांनीही सरकारला वेठीस धरणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. नागरिकांनी आपली भूमिका सरकारकडे लावून धरणे गरजेचे आहे तरच सरकारचे डोळे उघडतील, असे ते म्हणाले.

Web Title: Ashok Saraf was also hit by pits on the roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.