शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्पाची ऐशीतैशी; बुलेट ट्रेनसाठी २५० कोटी, हेलिकॉप्टरसाठी १५९ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 06:10 IST

अर्थसंकल्प मांडल्यानंतर अवघ्या चार महिन्यांत ११ हजार ४४५ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडण्याची नामुश्की फडणवीस सरकारवर ओढवली आहे.

नागपूर : अर्थसंकल्प मांडल्यानंतर अवघ्या चार महिन्यांत ११ हजार ४४५ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडण्याची नामुश्की फडणवीस सरकारवर ओढवली आहे. अर्थसंकल्प मांडताना एवढे नवे खर्च सरकारला कसे दिसले नाही आणि दिसले असल्यास सरकारने त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद का केली नाही, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.ज्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला शिवसेना व मनसेने विरोध केला आहे, त्यासाठी राज्याचा हिस्सा देण्यासाठी २५० कोटी रुपयांचा पुरवणी मागण्यांत तरतूद केल्याने शिवसेना काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना झालेल्या निर्णयानुसार एक हेलिकॉप्टर पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात २०१२ साली सरकारने विकत घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते हेलिकॉप्टर वापरत. त्यास अपघात झाला. त्यामुळे सरकार १५९ कोटी रुपये खचून आणखी दोन हेलिकॉप्टर खरेदी करीत आहे. ही खरेदी कुणासाठी आहे, याचा तपशील दिलेला नाही.मेट्रो प्रकल्पांसाठी भरीव तरतूदनागपूर मेट्रोसाठी १०० कोटी तर पुणे मेट्रोसाठी ३१२ कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्याचे सरकारने ठरवल्याने त्यासाठी ४१२ कोटी रुपये अतिरिक्त तरतूद केली आहे.मुंबईतील मेट्रो प्रकल्पांसाठीही ११७ कोटी रुपयांची सरकारने मागणी केली आहे. मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पांसह पुणे व नागपूर मेट्रो प्रकल्पांसाठी राज्य शासनाच्या दुय्यम कर्जासाठी १३० कोटी अतिरिक्त तरतूद करण्याचे ठरवले आहे.

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Maharashtraमहाराष्ट्र