शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

आशीष देशमुख दुसऱ्यांदा भाजपमध्ये जाणार; १८ जून रोजी गडकरी, फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश

By कमलेश वानखेडे | Updated: June 14, 2023 19:54 IST

माजी आमदार आशीष देशमुख हे पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

नागपूर : माजी आमदार आशीष देशमुख हे पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यासाठी १८ जून रोजीचा मूहुर्त निश्चित झाला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत कोराडी येथील नैवेद्यम नॉर्थस्टार सभागृहात प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे. देशमुख हे २००९ मध्ये सावनेर विधानसभेत भाजपकडून पराभूत झाले होते. त्यानंतर २०१४ मध्ये ते काटोलमधून भाजपच्या तिकीटावर विजयी झाले.

 पण भाजपच्या कारभारावर नाराजी व्यक्त करीत त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला व काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघात थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आव्हान दिले होते. नुकतेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सल्ला देणे व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केल्यामुळे देशमुख यांना काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने पक्षातून निष्काषित केले. त्यानंतर देशमुख यांनी भाजपशी जवळिक वाढविली. फडणवीस व बावनकुळे हे   देशमुख यांच्या घरी जाऊन आले. तेव्हाच देशमुख यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात होता. शेवटी १८ जूनचा मूहुर्त निघाला. 

टॅग्स :nagpurनागपूरBJPभाजपाAshish Deshmukhआशीष देशमुख