शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आशा वर्कर व गटप्रवर्तकांनी नागपुरात केला रास्ता रोको,पोलिसांकडून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 20:15 IST

सोमवारी आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सीटू) ने व्हेरायटी चौकात रास्तारोको करून जेलभरो आंदोलन केले.आंदोलनात दोन हजाराच्या जवळपास महिला रस्त्यावर उतरल्या होत्या.

ठळक मुद्देमानधन वाढीच्या मागण्यांसाठी सात दिवसांपासून आंदोलन

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : ग्रामीण आणि शहरी आरोग्य यंत्रणेत सेवा देणाऱ्या आशा वर्कर व गटप्रवर्तक गेल्या सात दिवसांपासून विविध आंदोलनाच्या माध्यमातून सरकार दरबारी आवाज उचलत आहे. सोमवारी आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सीटू) ने व्हेरायटी चौकात रास्तारोको करून जेलभरो आंदोलन केले. संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र साठे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनात दोन हजाराच्या जवळपास महिला रस्त्यावर उतरल्या होत्या.आशा स्वयंसेवकांना २५०० तर गटप्रवर्तकांना ८७२५ रुपये मानधन मिळते. आशा स्वयंसेवकाचे मानधन १० हजार करावे, त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, अशी मागणी संघटनेची आहे. यासंदर्भात आरोग्यमंत्र्यांशी चर्चा झालेली आहे. त्यांनी तीनपट मानधन वाढीचे आश्वासन दिले आहे. शिवसेनेचे कार्याध्यक्ष यांच्यासोबतही सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा संघटनेने केला आहे. २० ऑगस्ट रोजी मानधन वाढीसाठी आझाद मैदानावर निदर्शने केली होती. पण तोडगा निघाला नाही. सरकारजवळ अतिशय कमी वेळ आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागणार आहे. त्यामुळे १२ सप्टेंबरच्या आत मानधन वाढीचा जीआर काढावा, अशी मागणी संघटनेची आहे. त्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन करून संघटना सरकारचे लक्ष वेधत आहे. सोमवारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र साठे व महासचिव प्रिती मेश्राम यांच्या नेतृत्वात हजारोच्या संख्येने आशा वर्कर व गटप्रवर्तकांनी व्हेरायटी चौकात ठिय्या दिला. त्यामुळे वाहतूक खोळंबली होती. परिणामी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. मोठ्या संख्येने महिलांचा समावेश असल्याने आंदोलकांना ताब्यात घेताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. आंदोलनात रंजना पौनीकर, रूपलता बोबले, मंदा गंधारे, संगीता मेश्राम, पौर्णिमा पाटील, गीता मेश्राम, ज्योती कावरे, मंजुषा फटींग, संगीता राऊत आदींचा समावेश होता.

टॅग्स :WomenमहिलाEmployeeकर्मचारीagitationआंदोलन