विदर्भाच्या प्रधान मुख्य आयकर आयुक्तपदी आशा अग्रवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 23:03 IST2018-09-05T23:02:45+5:302018-09-05T23:03:43+5:30
भारतीय महसूल सेवेच्या १९८३ बॅचच्या अधिकारी आशा अग्रवाल यांनी ४ सप्टेंबरला विदर्भाचे प्रधान मुख्य आयकर आयुक्त आणि एनएडीटीच्या मुख्य महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.

विदर्भाच्या प्रधान मुख्य आयकर आयुक्तपदी आशा अग्रवाल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय महसूल सेवेच्या १९८३ बॅचच्या अधिकारी आशा अग्रवाल यांनी ४ सप्टेंबरला विदर्भाचे प्रधान मुख्य आयकर आयुक्त आणि एनएडीटीच्या मुख्य महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. यापूर्वी त्यांनी नागपुरात मुख्य आयकर आयुक्त आणि विदर्भात आयकर विभागाच्या मुख्य संचालक (अन्वेषण) म्हणून काम पाहिले. नागपुरात कार्यभार स्वीकारण्याआधी त्या अहमदाबाद येथे मुख्य आयकर आयुक्त म्हणून कार्यरत होत्या. त्यांना आयकर विभागाचा दीर्घ अनुभव आहे. बजेट कलेक्शनचे लक्ष्य, करदात्यांना न्याय आणि कर चुकवेगिरी करणाऱ्यांवर कायद्याची अंमलबजावणी या त्यांच्या उपलब्धी आहेत. आयकर खाते आणि करदात्यांमध्ये सौहार्दाचे वातावरण राहील, असे त्यांचे मत आहे.