काेराेना संक्रमणाचा चढता आलेख कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:08 IST2021-04-12T04:08:39+5:302021-04-12T04:08:39+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर/रामटेक/हिंगणा/उमरेड/नरखेड : नागपूर शहरासह ग्रामीण भागात रविवारी (दि. ११) काेरानाचे ७,१९४ रुग्ण आढळून आले असून, यात ...

काेराेना संक्रमणाचा चढता आलेख कायम
लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर/रामटेक/हिंगणा/उमरेड/नरखेड : नागपूर शहरासह ग्रामीण भागात रविवारी (दि. ११) काेरानाचे ७,१९४ रुग्ण आढळून आले असून, यात नागपूर शहरातील ४,६४१, तर ग्रामीण भागातील २,५५३ रुग्ण आहेत. नागपूर शहरातील ३६, तर ग्रामीण भागातील २० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात सर्वाधिक २२४ रुग्ण कळमेश्वर तालुक्यात आढळून आले असून, रामटेक तालुक्यात ८५, हिंगण्यात ७१, उमरेडमध्ये ६८ तर नरखेड तालुक्यात १९ रुग्णांची नाेंद करण्यात आली.
कळमेश्वर तालुक्यात रविवारी २२४ रुग्णांची भर पडली आहे. यात कळमेश्वर-ब्राह्मणी शहरातील ८८ तर ग्रामीण भागातील १३६ रुग्ण आहेत. तालुक्यातील कळंबी येथे १८, सुसुंद्री येथे १२, मोहपा शहरात ११, तेलगाव व खुमारी येथे प्रत्येकी ७, तेलकामठी, वाढोणा, मांडवी, कोहळी, पिल्कापार व परसोडी येथे प्रत्येकी ६, सेलू येथे ५, उपरवाही व पारडी (देशमुख) येथे प्रत्येकी ४, सोनेगाव, उबाळी, सावंगी व म्हसेपठार येथे प्रत्येकी ३, लिंगा, घोराड, पानउबाळी, धापेवाडा, गळबर्डी, सावंगी व पिपळा येथे प्रत्येकी २ तर आदासा, आष्टी (कला), घोगली, दहेगाव, निमजी व मोहगाव येथे प्रत्येकी एक रुग्ण पाॅझिटिव्ह आढळून आला आहे.
हिंगणा तालुक्यातही ७२ नवीन रुग्णांची नाेंद करण्यात आली. यात तालुक्यातील वानाडाेंगरी शहरातील २६ रुग्णांसह टाकळघाट येथील ९, शिरुळ येथील ७, हिंगणा शहरातील ६, डिगडोह येथील ५, अडेगाव येथील ४, गौताळा व येरणगाव प्रत्येकी ३, खैरी (पन्नासे), सुकळी (कलार), शेषनगर, कवडस, दाभा, रायपूर, तुरकमारी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या ७,७३७ झाली असून, यातील ५,४९९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, शिवाय, १४७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.