आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू अरुंधती पानतावणे यांना मातृशोक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 11:43 IST2018-09-14T11:41:49+5:302018-09-14T11:43:12+5:30
आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू अरुंधती पानतावणे यांच्या मातोश्री आणि बॅडमिंटन दुहेरीतील माजी राष्ट्रीय विजेते अरुण विष्णू यांच्या सासूबाई श्रीमती चित्रा पानतावणे यांचे शुक्रवारी पहाटे नागपुरात निधन झाले.

आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू अरुंधती पानतावणे यांना मातृशोक
ठळक मुद्देमाजी राष्ट्रीय खो-खो पटू चित्रा पानतावणे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू अरुंधती पानतावणे यांच्या मातोश्री आणि बॅडमिंटन दुहेरीतील माजी राष्ट्रीय विजेते अरुण विष्णू यांच्या सासूबाई श्रीमती चित्रा पानतावणे यांचे शुक्रवारी पहाटे नागपुरात निधन झाले. त्या विदर्भाच्या माजी राष्ट्रीय खो-खो पटू होत्या. त्या अॅथलेटिक्समध्ये १०० हर्डल्समध्ये त्यांनी राज्यविजेतेपदक मिळविले होते. आॅलिम्पियन राजीव बालकृष्णन यांचे मार्गदर्शक असलेले अविनाश पानतावणे यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती, मुलगी अरुंधती, अभिलाषा व मोठा आप्तपरिवार आहे.