शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

पुरुषांच्या मक्तेदारीला आव्हान देणारी नागपुरातील अरुणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 11:23 AM

विद्युत खांबावर चढून लाईन दुरुस्त करणारे तंत्रज्ञ विद्युत सहायक पाहिले तरी अंगावर काटा उभा राहतो. केवळ पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या कामाला एका महिलेने आव्हान म्हणून स्वीकारले आणि आयुष्याची एक वेगळी वाट निवडली. अरुणा वाटकर असे या तरुण महिलेचे नाव.

आनंद डेकाटेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विद्युत खांबावर चढून लाईन दुरुस्त करणारे तंत्रज्ञ विद्युत सहायक पाहिले तरी अंगावर काटा उभा राहतो. कालपर्यंत हे काम केवळ पुरुष मंडळीच करीत होती. परंतु केवळ पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या कामाला एका महिलेने आव्हान म्हणून स्वीकारले आणि आयुष्याची एक वेगळी वाट निवडली. अरुणा वाटकर असे या तरुण महिलेचे नाव. त्या सध्या एमएसडीसीएल (वीज वितरण कंपनी) वाडी येथील कार्यालयात तंत्रज्ञ विद्युत सहायक म्हणून कार्यरत आहेत.वीज विभाग म्हटला की, विजेच्या तक्रारी आल्या. एखाद्या परिसरातील वीज गेली असेल तर तेथे जाऊन दुरुस्ती करणे, एखाद्याचे मीटर खराब झाले असेल तर ते दुरुस्त करणे आदींसह थकीत बिलाच्या वसुलीपासून तर कार्यालयीन कामे त्यांना करावी लागतात. कर्तव्य म्हणून त्या ही सर्व कामे प्रामाणिकपणे पार पाडतातच परंतु त्यांना या कामामध्ये आनंदही मिळतो, हे विशेष. अरुणा या मूळचा नागपूरच्या तांडापेठ येथील रहिवासी. घरी चार बहिणी व एक भाऊ. आई-वडिलांनी चारही बहिणींना मुलाप्रमाणेच वागवले. वैशालीनगर येथील महात्मा फुले शाळेत दहावी तर एससीएस पाचपावली येथून बारावी झाल्यानंतर शासकीय आयटीआयमध्ये त्यांचा नंबर लागला. वायरमन शाखा त्यांनी निवडली होती. आयटीआयमध्ये मुली केवळ नावापूरत्याच होत्या. त्यामुळे सुरुवातीला त्यांचे मन लागले नाही. आयटीआय करायचेच नाही, असे त्यांना वाटू लागले. परंतु वडिलांनी हिंमत दिली. कोराडी पॉवर हाऊस येथे अप्रेंटिसशिप केली. पुढे नांदेड विभागात वीज विभागाच्या जागा निघाल्या. अरुणा यांनीही अर्ज केला. परीक्षा दिली आणि २०१३ मध्ये विद्युत सेवक म्हणून त्यांची निवडही झाली. हिंगोली येथील औंढा नागनाथ येथे त्यांना पहिली पोस्टिंग मिळाली. त्या एकदा वीज चोरी पकडण्यासाठी गेल्या. वीज चोरणारे महिलांना पुढे करतात. म्हणून अरुणा व त्यांच्यासोबत आणखी एक मुलगी अशा दोघींना पुढे पाठवण्यात आले. तेव्हा एक जण घरातूनच थेट आकडे टाकून वीज चोरी करीत असल्याचे दिसून आले. दोघींना पाहून त्याने आतूनच दार बंद केले. तेव्हा कसेबसे त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना बोलावून स्वत:ची सुटका करून घेतली. परंतु लहानपणापासूनच जीवनात काहीतरी वेगळे करायचे, असे ठरवल्याने आपण हे काम अगदी आनंदाने करतो असे त्या ठामपणे सांगतात.

टॅग्स :Women's Day 2018महिला दिन २०१८Baimanoosबाईमाणूस