नवोदित आर्किटेक्चर्सनी साकारले कलात्मक लॅण्डस्केप
By Admin | Updated: May 30, 2014 01:09 IST2014-05-30T01:09:45+5:302014-05-30T01:09:45+5:30
रस्त्याने जाताना एखादी इमारत लक्ष वेधून घेते. त्याचे डिझाईन मोहक असते, त्यामुळेच त्या निर्जीव इमारतीतही सौंदर्य निर्माण होते. त्या इमारतीत आत गेल्यावर आतील संरचनाही प्रसन्न वातावरण निर्मिती

नवोदित आर्किटेक्चर्सनी साकारले कलात्मक लॅण्डस्केप
सिस्फा गॅलरीत प्रदर्शनाचे उद्घाटन : श्रीकांत तनखीवाले यांचे मार्गदर्शन
नागपूर : रस्त्याने जाताना एखादी इमारत लक्ष वेधून घेते. त्याचे डिझाईन मोहक असते, त्यामुळेच त्या निर्जीव इमारतीतही सौंदर्य निर्माण होते. त्या इमारतीत आत गेल्यावर आतील संरचनाही प्रसन्न वातावरण निर्मिती साधणारी असते. एखाद्या इमारतीला सौंदर्य प्रदान करण्यामागे आर्किटेक्ट असतो. त्यामुळेच आर्किटेक्टला कलात्मक दृष्टी आणि ज्ञान असणे गरजेचे असते. आर्किटेक्टला कलात्मक दृष्टी असली तर कमी जागेतही जागेचा महत्तम उपयोग करून आर्किटेक्ट चांगले डिझाईन्स तयार करू शकतात. विद्यार्थ्यांंना हे कलात्मक ज्ञान मिळावे आणि त्यासाठी प्रत्यक्ष कार्याचा अनुभव यावा म्हणून श्रीकांत तनखीवाले यांच्या मार्गदर्शनात त्यांच्या ९0 विद्यार्थ्यांंनी पेंटिंग आणि स्केचेस, लॅण्डस्केप यांचे प्रदर्शन आयोजित के ले आहे. ‘एरियल परस्पेक्टिव्ह’ नावाच्या या प्रदर्शनाचे बुधवारी सिस्फाच्या लक्ष्मीनगर येथील गॅलरीत उद्घाटन करण्यात आले.
या प्रदर्शनाचे उद्घाटन आर्किटेक्ट मुकुंद शिरखेडकर आणि क्षितिज शिरखेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यात विद्यार्थ्यांंनी २ डी आणि थ्री डी चित्रेही रेखाटली आहेत. याप्रसंगी श्रीकांत तनखीवाले म्हणाले, आर्किटेक्ट परीक्षेसाठी तयारी करताना आणि जेईईची तयारी करताना केवळ चित्र या विषयावर ५0 टक्के गुण आधारलेले आहेत.
त्यामुळे ही कलात्मक दृष्टी असली तर या परीक्षात उत्तम गुण मिळविता येतात. मुलांना या बाबीची सवय व्हावी म्हणूनच हा उपक्रम राबविला.
यात तनखीवाले यांच्या सहा पेंटिंग आहेत तर इतर ९0 पेंटिंग विद्यार्थ्यांंनी काढले आहेत. उद्घाटनानंतर मुकुंद शिरखेडकर यांनी विद्यार्थ्यांंना मार्गदर्शन केले. कितीही थेअरीचा अभ्यास केला तरी हे क्षेत्र प्रत्यक्ष काम केल्याशिवाय कळत नाही.
या क्षेत्रात प्रत्यक्ष काम करणे आवश्यक आहे. त्यामुळे काम करीत राहणे आणि त्यात सातत्य राखणे गरजेचे आहे. अनेक विद्यार्थ्यांंची तक्रार असते की, आर्किटेक्ट करताना असाईन्टमुळे अजिबात वेळ मिळत नाही. पण प्रत्यक्षात आर्किटेक्ट झाल्यावर यापेक्षा जास्त काम आणि डिझाईन तयार करावे लागतात. त्यामुळे कामाची सवय आतापासूनच असली पाहिजे.
त्याशिवाय या क्षेत्रात यशस्वी होता येणार नाही. याप्रसंगी त्यांनी मुलांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरे दिली. कार्यक्रमाला अनेक नवोदित आर्किटेक्ट प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)