शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

स्वतंत्र प्रतिभेची कलाकृतीच अस्सल असते

By admin | Updated: July 6, 2014 00:56 IST

एखाद्या नाटककाराची एखादी नाट्यकृती लोकप्रिय झाली की, त्याच प्रकारच्या नाट्यकृती निर्माण करण्याचा मोह स्वाभाविकपणे होतो. जागतिक पातळीवरही हेच होत आले आहे.

सुनील रामटेके : ‘जावयाचं रामायण’ एकांकिका संग्रहाचे प्रकाशन नागपूर : एखाद्या नाटककाराची एखादी नाट्यकृती लोकप्रिय झाली की, त्याच प्रकारच्या नाट्यकृती निर्माण करण्याचा मोह स्वाभाविकपणे होतो. जागतिक पातळीवरही हेच होत आले आहे. पण स्वतंत्र प्रतिभेने स्वत:च्या विचार आणि आकलनातून वेगळ्या धाटणीची कलाकृती निर्माण करणारा नाटककार स्वत:ची स्वतंत्र वाट निर्माण करतो. यातच क्रांतीची बिजे असतात. हीच अस्सल आणि नवनिर्मित कलाकृती असते, असे मत डॉ. सुनील रामटेके यांनी शुक्रवारी व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान व श्री नवदुर्गा प्रकाशन, कोल्हापूरच्यावतीने श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात डॉ़ दिनेश काळे लिखित ‘जावयाचं रामायण’ या मराठी एकांकिका संग्रहाचे प्रकाशन लोकमतचे समन्वय संपादक कमलाकर धारप यांच्या हस्ते करण्यात आले़ याप्रसंगीडॉ़ सुनील रामटेके बोलत होते. कार्यक्रमाला ज्येष्ठ रंगकर्मी किशोर आयलवार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ललित कला विभागाच्या प्रा़ संयुक्ता थोरात, कवयित्री मनीषा साधू व रमेश बोरकुटे उपस्थित होते़ कलाकृतीच्या निर्मितीमागे प्रतिभावंताची अस्वस्थता असते. अनेक विवंचनेतून निर्माण होणाऱ्या प्रश्नमालिकेतून मिळालेल्या अंत:स्थ प्रेरणेच्या दाराने लिखाण स्फुरते़ कलाकृतीवर काळ, स्थिती आणि मानसिकतेचा प्रभाव पडतो़ जे दिसते आहे ते लिहिण्याची स्फूर्ती मिळते़ यातून लिहिण्याचे समाधान मिळते आणि साहित्यकृती निर्माण होते, असे डॉ़ सुनील रामटेके म्हणाले़ कलाकृती वास्तववादी व रंजनवादी असतात़ पूर्वी प्रत्येक कृती रंजनवादीच असायची़ दुसऱ्या महायुद्धानंतर लिखाणाची शैली बदलली़ वास्तव दु:खाचे सावट पसरल्याने कलाकृतीतून वास्तववाद प्रकट व्हायला लागला़ या घटनाक्रमातून ही परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाल्याचे ते म्हणाले़ याच बदलातून आता कमी शब्दांत कटाक्ष टाकणाऱ्या साहित्याची गरज भासायला लागली आहे़ हे कार्य कविता आणि नाट्य उत्तम करते़ म्हणूनच नवनाट्याच्या या काळात या गोष्टींकडे नाट्यलेखकांनी बघणे गरजेचे असल्याचे मत सुनील रामटेके यांनी व्यक्त केले. याप्रसंगी कमलाकर धारप यांनी लेखकाच्या नाट्यकृतींची प्रशंसा करून त्यांना पुढील लिखाणासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन अतुल शेबे यांनी केले़ यावेळी ‘आणि काय हवं’ व ‘जावयाचं रामायण’ या दोन एकांकिकांतील नाट्यप्रवेश सादर करण्यात आले़ (प्रतिनिधी)